पुण्यात झिकाचा शिरकाव; पिंपरी-चिंचवडकरांनो सावध व्हा

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमधे झिकाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी, तसेच हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने तत्काळ महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Edited By Admin
  • Tue, 2 Jul 2024
  • 11:22 am
pimpri chinchwad news, Zika

पुण्यात झिकाचा शिरकाव; पिंपरी-चिंचवडकरांनो सावध व्हा

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आढळला झिकाचा रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमधे झिकाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी, तसेच हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने तत्काळ महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केले आहे. 

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. हे डास खरे तर अमेरिकेमध्ये आढळतात. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारिक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत. पुणे शहरात झिका आजाराचा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील झिका विषाणू रुग्ण आढळू नये, याकरिता वैद्यकीय विभागाकडून त्या आजाराच्या अनुषंगाने खबरदारी व उपाययोजना करण्यात येत आहेत. झिका आजाराविषयी काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यात उपचार घ्यावेत, असे आवाहन डाॅ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

झिका आजाराची चिन्हे व लक्षणे

- बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात.

- यामध्ये ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.

- ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची आणि २ ते ७ दिवंसापर्यंत राहतात.

- झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे.

- गरोदरपणामध्ये झिका विषाणूची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो व बाळाच्या मेंदूची वाढ कमी होते, असे दिसून आले आहे.

काय आहेत उपचार ?

- झिका आजारावर कोणतेही विशिष्ठ औषध अथवा लस उपलब्ध नाही.

- रुग्णांवर लक्षणानुसार उपाय करणे आवश्यक असते.

- पिंपरी-चिंचवड मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये झिका विषाणूवरील उपचाराकरीता आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार उपलब्ध आहेत.

अशी घ्यावी खबरदारी...

- झिका विषाणू पसरवणारा एडिस डास दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे दिवसा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावे.

- डासांना प्रतिबंध करणाऱ्या साधनांचा वापर करावा.

- आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थ‍ित झाका.

- घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदला.

- पाण्याच्या टाक्या व्यवस्थ‍ित झाका.

- खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवा.

- आठवडयातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करून घासून-पुसून कोरडी करा.

- घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा.

- तापात ऍ़स्प‍िरिन किंवा ब्रुफेन अशी औषधे घेणे टाळा. ती धोकादायक ठरू शकतात.

- कोणताही ताप अंगावर काढू नका.

- घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच डास चावणार नाही व डास उत्पत्ती होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

- झिका विषाणू ग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंधातून सदर विषाणू पसरू शकतो, त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest