संग्रहित छायाचित्र
व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अडचणीमध्ये आमदार अण्णा बनसोडे कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. कोणत्याही व्यापाऱ्याला कधीही त्रास न दिलेला आमदार म्हणून त्यांची सर्व व्यापाऱ्यांमध्ये प्रतिमा आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प मधील सर्व व्यापारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी आहेत. कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्याबद्दल आपुलकीचा सूर आवळला.
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (१३ नोव्हेंबर) पिंपरी कॅम्प परिसरात प्रचार दौरा केला. लिंक रोड येथून पदयात्रेला सुरुवात झाली. देवी लिंक, पत्रा शेड, रमाबाई नगर, भाटनगर, बौद्ध नगर, आंबेडकर कॉलनी, भीमनगर, सेनेटरी चाळ, भाजी मंडई, फुल मार्केट, फळ मार्केट, शगुन चौक, डिलक्स चौक, संजय गांधीनगर, मिलींदनगर, सुभाष नगर, शास्त्री नगर, साई चौक या भागातून ही पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी माजी उपमहापौर, संदीप वाघेरे, दीपक मेवानी, संजय अवसरमल, बबलू सोनकर, रमेश शिंदे, नजीर मुलानी, संतोष वडमारे, अरुण टाक, जगन्नाथ साबळे, गौतम रोकडे, प्रवीण वडमारे,अरुण वडमारे, रमेश शिंदे, भाऊसाहेब अभंग, अस्लम मणियार, सुनील रोकडे, सचिन सुर्वे, राजू सावन, निलेश निकाळजे, सूर्यकांत उबाळे, श्रीराम कांबळे, महेश तुपे, राजू ओव्हाळ, रोहित जाधव, बापूसाहेब गाडे, राम शिंगारे आदी उपस्थित होते.
सर्व व्यापाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांना आपल्या दुकानात नेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. पिंपरी मधील व्यापारी आणि अण्णा बनसोडे हे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे, हे या प्रचार दौऱ्यात दिसून आले. प्रत्येक व्यापाऱ्याशी आमदार अण्णा बनसोडे चर्चा करत होते. भाजी मंडई येथे आल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांसोबत चहा घेतला. त्यावेळी भाजी मंडई मधील पत्र्याचे शेड अण्णा बनसोडे यांनीच बांधून दिल्याची आठवण भाजी विक्रेत्या महिलांनी करून दिली. शेडमुळे व्यवसायासाठी मोठी मदत होते. सावलीमध्ये बसून भाजी विक्री करता येते, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामुळे इथल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र आणि हक्काचे पक्के घर मिळणार आहे. एखाद्या कुटुंबात दोन भाऊ असतील तर त्यांना प्रत्येकाला घर मिळेल. भाजी मंडई मध्ये ३५० गाळ्यांसाठी शेड उभारण्यात आले आहे. तिथल्या सर्व विक्रेत्यांना आहे त्या ठिकाणी पक्के गाळे बांधून दिले जाणार आहेत. - आमदार अण्णा बनसोडे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.