रुग्णांना चुकीचे रक्त चढवणाऱ्या औंध रुग्णालयातील 'त्या' दोन परिचारिकांचे निलंबन; रक्त चढवीत असताना बोलत होत्या मोबाईलवर

सांगवी येथील रुग्णांना चुकीचे रक्तगट दिल्याप्रकरणी औंध जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिकेला तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मोबाईल फोनवर संभाषणात करताना विलचित होऊन चुकीचे रक्त संक्रमण केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

संग्रहित छायाचित्र

चुकीच्या गटाचे रक्त दिल्याने दोन रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढला निलंबनाचा आदेश

सांगवी येथील रुग्णांना चुकीचे रक्तगट दिल्याप्रकरणी औंध जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिकेला तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मोबाईल फोनवर संभाषणात करताना विलचित होऊन चुकीचे रक्त संक्रमण केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन परिचारिकांचे तडकाफडकी निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.  याबाबत 'सीविक मिरर' ने मंगळवारी (२६ मार्च) या प्रकरणाला वाचा फोडली होती. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. औंध रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रिती ठोकळ (Priti Thokal) आणि शांता मकलूर (Shanta Maklur) अशी या दोन परिचारिकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.

दत्तू सोनाजी सोनवणे आणि दगडू कांबळे यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघांनाही श्वास घेण्यास त्रास, पायाला सूज आणि इतर समस्या होत्या. त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा कमी असल्याने, दोघांनाही त्वरित रक्तसंक्रमण आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. डॉ. किरण खलाटे हे ऑन ड्युटी डॉक्टर होते, त्यांनी नर्सिंग स्टाफकडून रुग्णांना रक्त देण्याचे निर्देश दिले. संबंधित परिचारिकेने निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट 'ए' पॉझिटीव्ह असताना त्यांना 'बी; पॉझिटिव्ह रक्त चढवले. तर त्यांच्या शेजारील रुग्ण दगडु कांबळे यांना 'बी' पॉझिटिव्ह रक्तगट असताना 'ए' पॉझिटिव्ह रक्त चढवले. दोन्ही रुग्णांना रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परिचारिकेच्या या गंभीर चुकीमुळे दोन्हीही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

या घटनेनंतर सिव्हिल सर्जन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. जिल्हा शल्यचिकित्सक येम्पल्ले यांनी मंगळवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बैठक बोलावली. या बैठकीत असे आढळून आले की, रक्तसंक्रमण करताना परिचारिका फोनवर बोलत होत्या. या निष्काळजी वर्तनामुळे रुग्णांना चुकीच्या रक्त पिशव्या देण्यात आल्या. त्यामुळे प्राथमिक तपासात परिचारिका दोषी आढळून आल्याचे निष्पन्न झाले. (Aundh Hospital)

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) तरतुदीनूसार दोन परिचारिकेचे निलंबन करण्यात आले आहे. २६ मार्च २०२४ रोजी दोन परिचारिकेचे सेवानिलंबन कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यांना सक्षम अधिका-यांच्या पुर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच खासगी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही. इतर उद्योग, व्यापार केल्याचे निदर्शनास आल्यास गैरवर्तन समजून निर्वाहभत्ता मिळण्यास अपात्र ठऱवण्यात येणार आहे,असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. येम्पल्ले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

आरोग्यसेवेत निष्काळजीपणा करत चुकीचे रक्तगट रुग्णांना दिले होते. त्यामुळे दोन परिचारिकांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.  त्यांच्या कृतीमुळे एक महत्त्वपूर्ण त्रुटी आली आणि दोन्ही रुग्णांचे जीवन धोक्यात आले. रुग्णांना अतिदक्षता विभागात हलवावे लागले. सुदैवाने, दोन्ही रुग्ण आता बरे झाले आहेत.

-डॉ. नागनाथ येम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औंध 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest