विकासाचा पॅटर्न अविरत राहण्यासाठी शंकर जगताप यांनाच पाठिंबा

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने पिंपळे निलख, वाकड आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा नवा 'पॅटर्न' अमलात आला. या पॅटर्नच्या माध्यमातून आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमच्या गावात झाली आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावाचे रुपडे बदलले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 14 Nov 2024
  • 01:23 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपळे निलख-वाकड येथील ग्रामस्थांनी केला निर्धार

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने पिंपळे निलख, वाकड आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा नवा 'पॅटर्न' अमलात आला. या पॅटर्नच्या माध्यमातून आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमच्या गावात झाली आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावाचे रुपडे बदलले. 

लक्ष्मण जगताप यांनी सुरू केलेला हा विकासाचा पॅटर्न असाच अविरत सुरू राहण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच विकासाची दूरदृष्टी असलेले त्यांचे बंधू आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनाच आमचा जाहीर पाठिंबा असून त्यांना गावातून हजारो मतांचे लीड आम्ही देणार असल्याचा विश्वास पिंपळे निलख, वाकड ग्रामस्थांनी व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं (आठवले) महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख परिसरात जोरदार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी परिसरातील हजारो ग्रामस्थ, महिला आणि युवा वर्ग स्वयंस्फूर्तीने या पदयात्रेत सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजीत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जागोजागी महिलांकडून शंकर जगताप यांचे औक्षण आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते सचिन साठे, माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, माजी नगरसेविका आरती चौंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, संतोष कलाटे, नितीन इंगवले, भुलेश्वर नांदगुडे, काळूराम नांदगुडे, संकेत चोंधे, शिरीष साठे, नंदू बालवडकर, पवन कामठे, प्रसाद कस्पटे, रामदास कस्पटे, बाळासाहेब इंगवले, अनिल जेधे, महेश चव्हाण, महबूब शेख, चंदन काहार, अशोक शिंदे, संजय मानमोडे, दादासाहेब कामटे, भाऊसाहेब घरपळे, प्रदीप जगताप, विवेक जगताप, भागवत, गणेश कस्पटे, आनंद साठे, दीपक गोते, सोमनाथ कस्पटे, सचिन कस्पटे, निखिल कस्पटे, अक्षय कस्पटे, संतोष दळवी, शंकर साठे, साहेबराव नांदगुडे, संतोष साठे, नरेश जाधव, काळुराम नांदगुडे, रवी इंगवले, विनोद सूर्यवंशी, गणेश अंत्रे, संतोष कलाटे, रणजीत कलाटे, स्नेहा कलाटे, सुनील येडे, बाळासाहेब करंजुले, अनंत कुंभार, अनिल संचेती, काळूराम नांदुगडे, विलास थोरात, उमाकांत ठाकरे, आनंदात दौंडकर, कैलास भानुसे, नागेश अकुल, हेमंत पाटील, संतोष चाटण, दिलीप बालवडकर, अशोक बालवडकर, चंद्रकांत झगडे, कलेश्वर साळुंखे, उदय मोघे, अरविंद शिरोळे यांच्यासह मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे निलखच्या विकासासाठी कटिबद्ध - शंकर जगताप

पिंपळे निलख परिसरात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः वेणूनगर येथील तपोवन बौद्ध विहार, काळेवाडी फाटा येथील पुरोहित समाज सेवा ट्रस्ट आणि मानकर चौक येथील सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. विशालनगर, शारदा कॉलनी आणि एनएसजी रॉयल वन याठिकाणी असलेल्या मनपाच्या जागेत ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. मानकर चौक या ठिकाणी वाहतूक बेटाची निर्मिती आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. पिंपळे निलख परिसरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, अनेक सोसायट्यांमध्ये सौर ऊर्जा दिवे, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण, कस्पटे वस्ती येथील स्मशानभूमी येथे पत्राशेड बांधण्यात आले. तसेच विशालनगर येथील विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयातील स्पर्धा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तके, कपाट आणि टेबल-खुर्च्या या उपलब्ध करून देण्यात आले. अशा प्रकारची सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विकासकामे या प्रभागात करण्यात आली आहेत. हा विकासकामांचा वेग असाच सुरू राहावा यासाठी मीदेखील प्राधान्याने काम करणार असून त्यासाठी सर्व पिंपळे निलख आणि वाकडकरांची मला मोलाची साथ मिळेल, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest