सुनील शेळके व साथीदारांनी माझ्या मुलाचा खून केला – सुलोचना आवारे

जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे हत्या करण्यात आली. यानंतर किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. माझ्या मुलाचा खून आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या साथीदारांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sat, 13 May 2023
  • 09:46 am
सुनील शेळके व साथीदारांनी माझ्या मुलाचा खून केला – सुलोचना आवारे

किशोर आवारे

किशोर आवारे यांच्या आईचा आरोप

जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे हत्या करण्यात आली. यानंतर किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. माझ्या मुलाचा खून आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या साथीदारांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

किशोर आवारे यांच्या हत्येनंतर आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत सुलोचना यांनी म्हटले की, सुनील शेळके, भाऊ सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे किशोर मला नेहमी सांगायचा. ड्रायव्हर प्रवीण ओव्हाळ याला सुधाकर शेळके तसेच त्याच्या साथीदारांनी माझ्यासोबत असताना शिवीगाळ देखील केली होती. किशोर याने आपला स्वतःचा वेगळा गट तयार केल्याने व गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे राजकीय केलेल्या विरोधामुळे सुनील शेळके यांच्या मनात एक राग होता. सुनील शेळके यांनी केलेल्या चुकीच्या कामाच्या विरोधात वेळोवेळी निदर्शने देखील किशोरने केली होती.”

तसेच सोशल मीडियावर देखील या प्रकारची माहिती त्याने टाकली होती. हा सर्व राग मनात धरून सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचुन आपल्या साथीदारांच्या मदतीने किशोर आवारे याचा खून केला. संगनमत करून माझ्या मुलाचा खून केलेला आहे. त्याच्या ज्यांनी खून केला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे किशोर आवारे यांच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest