भारतातील अठरा शिवपीठांपैकी एक असलेल्या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्या तीर्थ आणि कुंडांचा अभ्यास दौरा नुकताच इंद्रायणी साहित्य परिषदेच्या पुढाकारातून पार पडला. त्यामधे साहित्य, इतिहास संशोधन क्षेत्रातील सुमारे शंभरजण सहभागी झाले होते. आळंदीतील पुरातन वारसा व त्याच्या पाऊलखुणा जतन करण्याची गरज असल्याचे मत सर्वांनी नोंदवले.
आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या तेरा तीर्थांची आणि पुरातन आळंदीची माहिती वारसास्थळांचे अभ्यासक ॲड. नाजिम शेख यांनी प्रत्यक्ष त्या त्या स्थळांवर जाऊन दिली. त्य़ांनी विविध धर्मग्रंथांच्या आधारे गेली वीस वर्षे संशोधन करून या स्थळांचा शोध घेतला. दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुणे महापालिकेचे निवृत्त उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक व नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यामध्ये साहित्यिक राजेंद्र घावटे, संतोष घुले, डॉ. लता पाडेकर, डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, प्रा. शंकर जाधव, संगीता थोरात, क्रांती दिवेकर, विजय भिसे, उमेश सातकर, विजय पिरंगुटे, उत्तरेश्वर तोडकर, भालचंद्र वडके, भार्गवी लेले, विवेक नातू, सुलभा कणसे, हिरामण सस्ते, संजय जोशी, गणेश सस्ते, अमर कांदे, सुरेश आल्हाट, ज्ञानेश्वर वायकर, संतोष सस्ते, बाळासाहेब सस्ते, विठ्ठल कामठे, अलंकार हिंगे, रमेश राक्षे, गोविंद जाधव, नंदकुमार वाघमारे, शुभम गौंदर, संदीप गावडे, सुरेश लोखंडे, सुरेश डोळस, निसार महंमद सय्यद, दीपक पटेकर, अमोल पाटोळे, वासुदेव गोडे, निलेश भोसले, रविंद्र पाटील आदी सहभागी झाले होते. इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे, अलंकार हिंगे, गणेश शशिकांत सस्ते, सुनील जाधव यांनी दौऱ्याचे संयोजन केले. अखेरीस श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सांगता झाली.
आळंदीचे स्थळ महात्म्य पुरातन काळापासून आहे. त्याच्या पाऊलखुणा आता नष्ट झाल्या आहेत किंवा ज्या काही शिल्लक आहेत. त्या दुर्लक्षित आहेत. त्याचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच आपली सर्वांचीच आहे. त्यासाठी हा प्रयत्न आहे.
- अरुण बोऱ्हाडे, ज्येष्ठ साहित्यिक, मोशी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.