रेशन धान्य दुकानातील काळाबाजार थांबवा

शासनमान्य रेशन दुकानावरील धान्याच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी आणि धान्य वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याची तत्काळ दखल घ्यावी अन्यथा गरिबांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी आणि दुकान चालकांना ठोकून काढू, असा इशारा देत छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने निगडी अन्न पुरवठा विभागाच्या 'अ' व 'ज' कार्यालयावर गुरुवारी 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.

निगडीतील शिधापत्रिका कार्यालयावर छावा मराठा महासंघाचे 'जवाब दो' आंदोलन, दुकानदारांकडून होणारी फसवणूक थांबवण्याची मागणी

शासनमान्य रेशन दुकानावरील धान्याच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी आणि धान्य वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याची तत्काळ दखल घ्यावी अन्यथा गरिबांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी आणि दुकान चालकांना ठोकून काढू, असा इशारा देत छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने निगडी अन्न पुरवठा विभागाच्या 'अ' व 'ज' कार्यालयावर गुरुवारी 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या माध्यमातून कार्यालयासमोर घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले. ई पॉस मशिन प्रणाली व्यवहारात आणली आहे. परंतु इ पॉस मशिनचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने कार्डधारकांना हे धान्य वेळेत मिळत नाही. मिळाले तरी पूर्ण लाभापेक्षा कमी धान्य देऊन दुकानदार कार्डधारकाची फसवणूक करतात. तसेच दुकानदारांमार्फत कार्डधारकाचा थंब घेतल्यानंतर त्यांना पावती दिली जात नाही. दुकानचालक उडवा-उडवीची उत्तरे देत धान्य बंद करण्याची धमक्या देतात. याचा फटका निराधार नागरिकांना बसतो. त्यांना निर्धारित धान्यापेक्षा कमी धान्य वितरित केले जाते, याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महागाईने त्रस्त झालेल्या महिला भगिनींना याची सर्वात मोठी झळ सोसावी लागत आहे, एकीकडे लाडकी बहीण म्हणून योजना जाहीर करायच्या तर दुसरीकडे त्याच बहिणींच्या ताटातील घास प्रशासनाला पुढे करून हिसकावून घ्यायचा हा सरकारचा गंभीर प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ई पॉस मशिन सर्व्हरमधील अडचणी हे सरकार दूर करू शकत नसेल तर हे सरकारचे अपयश आहे. काळ्या बाजारातून स्वतःचे खिसे भरण्यासाठी यावर कायमचा तोडगा काढला जात नाही हे स्पष्ट करावे. शासनाने स्वस्त धान्य ऑफलाइन देण्याचा निर्णय घेतला तरी सर्व्हरचे कारण देत मुजोर दुकानदार धान्य देत नसल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे.  याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

यापुढे निराधारांचे गरिबांचे ताटातील धान्य ओरबडणाऱ्या दुकानदार आणि अधिकाऱ्यांना ठोकून काढू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी दिला. जनतेची होणारी लूट त्वरित थांबवून आपल्या गलथान कारभारात सुधारणा करून जनतेला न्याय देण्याची मागणी यातून करण्यात आली. तसेच, संघटनेच्या वतीने ९९६०१२६३१३ हा टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आला.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, मौलाना अब्दुल गफार, युवती प्रदेश कार्याध्यक्ष किरण नाईकडे पाटील, जिल्हाध्यक्षा हेमलता लांडे पाटील, उपाध्यक्ष नीलम सांडभोर,विष्णू बिरादार, संपर्कप्रमुख गणेश सरकटे, शहर उपाध्यक्ष विलास भोईने, महेंद्र शिंदे,महिला शहराध्यक्ष निशा काळे, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीक शेख, गजानन बिरादार, मोहन अडसूळ, सचिन आल्हाट, वंचित नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या आहेत मागण्या

  • ई पॉस मशिन सर्व्हरमध्ये सतत होणाऱ्या बिघाडावर किंवा अतिभारावर तोडगा काढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा
  • कार्डधारकास ई पॉस मशिन प्रणालीद्वारे पावती देऊन, पावतीनुसार पूर्ण धान्य देण्याचे निर्देश द्यावे. 
  • कार्डधारकास ई पॉस मशिन प्रणालीद्वारे पावती देऊन, पावतीनुसार पूर्ण धान्य देण्याचे निर्देश द्यावे.
  • कमी धान्य देणाऱ्य दुकानदारांना काळ्या यादीत टाकून त्यांचे परवाने कायमचे आणि त्वरित रद्द करावे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest