संग्रहित छायाचित्र
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे बहाण्याने आयटीमध्ये काम करणार्या रशियन आरोपीस सायबर पोलिसांनी गोवा येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. टोनी अँटोली मिरोनोव्ह (वय ३० वर्षे रा.३२, लेनिनस्की, ओरेनबर्ग सिटी, रशिया पासपोर्ट नंबर ७६६१४६५७२ सध्या रा. घर नं.. १३५ हनुमान मंदिराजवळ, मधलमज, मन्ड्रेग पेरनम, गोवा) असे अटक केलेल्या रशियन आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे राहणार्या तसेच आयटीमध्ये काम करणार्या एकाची शेअर बाजाराच्या नावाखाली ७१ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर घेतली असल्याचे दिसून आले. त्यातील कॉसमॉस बँकेचे खाते क्रमांक १३५१००१०७८१ यावर २६ नोव्हेंबर रोजी २८ लाख रुपये आरोपी यांनी घेतले. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार साहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी व पथकास गोवा येथे पाठविले. गोव्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने रशियन नागरिक याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचा मार्क नावाचा साथीदार तसेच श्रेयश संजय माने (वय २२, रा. मुळ सागर कॉलनी शास्रीनगर, कोथरूड, पुणे) यांच्यासह करीत असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली.
आरोपी श्रेयश माने हा त्याचे मित्रांकडून गेमिंगच्या नावाने अकाऊंट व त्यांचे लिंक मोबाइल नंबर घेऊन विमानाने गोवा येथे जाऊन सदर रशियन आरोपी यांना पुरवून त्यांचेसोबत सदरचे गुन्हे करीत होता. दाखल गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, साहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, साहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, प्रकाश कातकाडे, अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरम घाटे, दीपक माने, परशुराम चव्हाण, सूरज जाधव, सुरंजन चव्हाण, अनिकेत टेमगिरे, महेश मोटकर, सचिन घाडगे, नीलेश देशमुख, दीपाली चव्हाण, मोनिका चित्तेयार, स्मिता पाटील, दीपाली टोपे यांच्या पथकाने केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.