संग्रहित छायाचित्र
परभणी येथील संविधान विटंबाची घटना निषेधार्थ असून पोलीस प्रशासनाने समाजामध्ये दुरी निर्माण करणाऱ्या माथेफिरू यांच्यावर कारवाई करावी आणि महाराष्ट्र राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व स्मारक संरक्षित करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अमर साबळे यांनी केली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, प्रवक्ते तथा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, अमेय देशपांडे, दीपक भंडारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या देशाचा कारभार संविधानाने चालेल. संविधान हे देशाचे सर्वोच्च ग्रंथ आहे. अशा प्रकारची निष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. परंतु विरोधकांचा अजेंडा जातीय तणाव निर्माण करणे हा असल्यामुळे संविधानाच्या संदर्भात फेक नरेटिव्ह चालवणे हे त्यांचे षडयंत्र असल्यामुळे विरोधकांकडून तरुणांची माथी फिरवण्याचे काम सुरू आहे.
संविधानाची विटंबना हे हीन कृत्य केल्यामुळे समाजामध्ये तेढ सुरू झाली आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचे पाप विरोधक करतात असा पाठीमागील इतिहास आहे.
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनता त्या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्रात ताण तणाव निर्माण करण्याची विरोधकांची साजिश आहे. महाराष्ट्र शासनाने अशा माथेफिरू यांच्यावर कडक कारवाई करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या स्मारकाचे संरक्षण करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.