पीएमपी बस थांब्यांची दुरवस्था

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने जलद व सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी बीआरटी मार्गिका उभारण्यात आली. यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसथांबे उभारले आहेत. मात्र, या थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, निगडी ते दापोडी या मार्गावरील थांब्यांवर अस्वच्छता देखील पसरलेली दिसत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 13 Nov 2024
  • 01:21 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

निगडी ते दापोडी मार्गावरील बसथांब्यांचे पत्रे उखडले, लाखो रुपये खर्च करून बांधलेले बसथांबे ठरलेत डोकेदुखी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने जलद व सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी बीआरटी मार्गिका उभारण्यात आली. यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसथांबे उभारले आहेत. मात्र, या थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, निगडी ते दापोडी या मार्गावरील थांब्यांवर अस्वच्छता देखील पसरलेली दिसत आहे.  

निगडी ते दापोडी या साडेबारा किलोमीटरवर बीआरटी मार्गिका आहेत. प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी व उतरण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल उभारले असून, निगडीतील लोकमान्य टिळक चौक, बजाज गेट, आकुर्डी, काळभोर नगर, जयश्री टॉकीज, चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट, मोरवाडी, पिंपरी, खराळवाडी, वल्लभनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या ठिकाणी थांबे उभारले आहेत. या थांब्यांसाठी लाखो रुपये खर्च केला आहे. मात्र, सध्या थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

या थांब्यांवर साफसफाई केली जात नसल्याने अस्वच्छता झाली आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने प्रवाशांना त्या ठिकाणी थांबणेही अवघड होते.  निगडीतील लोकमान्य टिळक चौकातील पीएमपीचा मुख्य थांबा आहे. मात्र, येथे ठिकठिकाणी अस्वच्छता असते. कचरा अस्ताव्यस्थ पडलेला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे प्रवाशांना अक्षरशः नाकाला रुमाल धरून थांबावे लागते. या थांब्यांचे छत तुटलेले आहेत. सर्वत्र पडलेला कचरा, तुटलेला पत्रा, ठप्प वीजपुरवठा, उखडलेल्या फरशा अशा प्रकारची अवस्था सध्या बीआरटी मार्गिकेतून बस थांब्यांची झाली आहे. त्यामुळे हे थांबे अस्वच्छतेचे आगार बनले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले बसथांबे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest