Pimpri Chinchwad: संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडवणार

पिंपरी-चिंचवड: येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) उद्योजक नागरी सुविधा मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. राज्याचा उद्योग विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका नक्की कोणाकडे मागणी करायची यावरून उद्योजक संभ्रमात आहेत.

संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडवणार

एमआयडीसीतील सुविधांवरून उद्योजकांत संभ्रम, जबाबदारी स्वीकारण्यावरून उद्योग विभाग आणि महापालिकेत टोलवाटोलवी

(पंकज खोले)
पिंपरी-चिंचवड: येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) उद्योजक नागरी सुविधा मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. राज्याचा उद्योग विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका नक्की कोणाकडे मागणी करायची यावरून उद्योजक संभ्रमात आहेत. (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी अथवा स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. त्यामुळे जेणेकरून एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी उद्योजकांना एक आधार मिळेल, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.

भोर म्हणाले,  गेली कित्येक वर्ष एमआयडीसी परिसरातील उद्योजक संभ्रमावस्थेत आहेत. त्यांच्या समस्यांचे निवारण नेमके कोण करणार, असा प्रश्न निर्माण होतो आहे.  एमआयडीसी, उद्योग खाते आणि महापालिका या तिघांपैकी कोणीही या उद्योजकांच्या समस्याच सोडवण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसते. एमआयडीसीमधून महापालिकेला व औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कर दिला जातो आणि या बदल्यामध्ये एमआयडीसीला कोणत्या सुविधा महानगरपालिकेकडून दिल्या जातात याबाबत कित्येक वर्ष वाद आहेत.  महानगरपालिकेतर्फे लवकरच सुविधा देऊ, असे आश्वासनदेखील दिले होते. परंतु प्रत्यक्ष कृती झाली नाही. गेली अनेक वर्ष उद्योजक अनेक समस्यांमुळे त्रस्त आहेत. शासनाकडून उद्योजकांना सोयीसुविधा मिळण्यास अडचण येते. 

एमआयडीसी भागात स्वच्छता, आरोग्य, वीज कर, प्रॉपर्टी ट्रान्सफर, उद्योग धंदा परवाना यासारख्या अनेक सुविधा उद्योजकांपर्यंत पोहोचत नाहीत. एजंटचा सुळसुळाट झाला असून,  उद्योजकांना मोठे भुर्दंड पडतात. त्यांना नाहक दंडात्मक कारवाईलासुद्धा सामोरे जावे लागते. कंपन्यांच्या बाहेर अतिक्रमण होत आहे. अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत. कंपन्यांमध्ये कामगार वर्ग कामासाठी येत असतो, परंतु या कामगार वर्गाला विविध समस्यांनाही सामोरे जावे लागते.  कामगारांची संख्या दोन ते तीन लाखांच्या वर आहे.  एवढे असूनसुद्धा जर एमआयडीसीला स्वतंत्र अधिकारी व स्वतंत्र कक्ष नाही, तो त्वरित व्हावा, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडवणार

 संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडविण्याकरिता मदत करण्यात येईल. संघटनेने केलेल्‍या आंदोलनांना यशही येत आहे, असे मत पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्‍यक्‍त केले. संघटनेच्या अध्यक्षपदी बेलसरे यांची निवड झाली. संघटनेने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा संघटनेचे सचिव जयंत कड यांनी घेतला. संघटनेने लघुउद्योजकांना वाढीव आलेल्या वीज बिलासाठी महावितरण कार्यालय भोसरी येथे आंदोलन करून वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचेकडे शास्तीकर सरसकट माफीसाठी सतत पाठपुरावा करून सरसकट तो माफ करून घेतला. महावितरण भोसरी डिव्हिजनचे तीन सब डिव्हिजनमध्ये विभाजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष - संजय जगताप, विनोद नाणेकर, संचालक- संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रवीण लोंढे, प्रमोद राणे, सचिन आदक तसेच स्‍वीकृत संचालक- तात्या सपकाळ, माणिक पडवळ, संजय भोसले, श्रीपती खुणे, सुरेश गवस, नरेंद्र निकम, प्रमोद दिवटे, अजय लोखंडे, गौरंग बनकर, गणेश खेडकर व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest