पिंपरी-चिंचवड: जिजामाता रुग्णालयात उपचार शुल्काचा घोटाळा

महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशांवर वैद्यकीय अधिकारी व लिपिकाने डल्ला मारला आहे. शुल्कापोटी १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये जमा झाले असताना बँकेत फक्त ८ लाख ८९ हजार ६६५ रुपये भरले आहेत.

Pimpri Chinchwad News, Jijamata Hospital, Corruption, PCMC News

वैद्यकीय अधिकारी, लिपिकांनी मारला दहा लाखांवर डल्ला

महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशांवर वैद्यकीय अधिकारी व लिपिकाने डल्ला मारला आहे. शुल्कापोटी १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये जमा झाले असताना बँकेत फक्त ८ लाख ८९ हजार ६६५ रुपये भरले आहेत. म्हणजेच ९ लाख ७६ हजार ६९१ रुपयांचा भ्रष्टाचार आरोग्य वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, लिपिक यांनी संगनमताने केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या महिलाध्यक्षा सायली नढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील १ मार्च ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये रुग्णालयात रोजच्या रोज जमा होणाऱ्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ही रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी वापरली. तब्बल ९ लाख ७६ हजार ६१९ रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. बँकेतील कर्मचारी रुग्णालयामधून दररोज जमा होणारी रक्कम घेऊन जातात. मात्र, रुग्णालयातील रक्कम दररोज जमा होत नसतानाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी शिक्के मारले आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवी व वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर या अधिकारी या कालावधीमध्ये उपस्थित असतानाही डॉ. विकल्प भोई यांना भरणा रजिस्टरवर सह्या करण्यास लावल्या आहेत. रुग्णालयात असलेल्या नोंदीनुसार १८ लाख रुपये या कालावधीत जमा झाले असताना बँकेत फक्त ८ लाख ८९ हजार रुपये भरण्यात आले आहेत. बाकीच्या रकमेचा परस्पर अपहार केला आहे. या प्रकरणात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेन होतवानी, डॉ. वैशाली बांगर, डॉ. विकल्प भोई, लिपिक आकाश गोसावी यांनी पदाचा गैरवापर करत हा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे. त्यामुळे या सर्वांचे सेवानिलंबन करावे. तसेच चौकशी समिती नियुक्त करून रुग्णालयाचे लेखापरीक्षण करावे अशी मागणी सायली नढे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest