Pimpri-Chinchwad Ganeshotsav 2024: डीजेचा‌ दणदणाट आणि फुले अन् भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पिंपरीमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, फुले - भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि डीजेच्या दणदाणाटासह ढोल-ताशांच्या गजरात पिंपरी मध्ये मंगळवारी (दि. 17) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका काढल्या. प्रमुख मंडळांनी आकर्षक रथांमध्ये मिरवणुका काढल्या. अनेक मंडळांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 18 Sep 2024
  • 12:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

फाईव्ह स्टार तरुण मंडळाचे प्रथम विसर्जन

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, फुले - भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि डीजेच्या दणदाणाटासह ढोल-ताशांच्या गजरात पिंपरी मध्ये मंगळवारी (दि. 17) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका काढल्या. प्रमुख मंडळांनी आकर्षक रथांमध्ये मिरवणुका काढल्या. अनेक मंडळांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.

पिंपरी मध्ये स्व इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, कराची चौक मार्गे झुलेलाल घाट, पिंपरी घाट अशी मिरवणूक काढली जाते. नेहरूनगर, भाटनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी कॅम्प या परिसरातील गणेशोत्सव मंडळे वरील मार्गावरून मिरवणूक काढतात.

पिंपरी घाटावर महापालिकेच्या वतीने कृत्रिम हौद बांधण्यात आले होते. त्यामध्ये सर्व मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पिंपरी येथील कराची चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षामध्ये या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.

पिंपरी मध्ये प्रथम फाईव्ह स्टार तरुण मंडळाचे विसर्जन झाले. त्यानंतर मोरया मित्र मंडळ गांधी नगर पिंपरी, सदानंद तरुण मित्र मंडळ पिंपरी, शिवशंकर मित्र मंडळ गांधीनगर, हर्षल मित्र मंडळ पिंपरी कॅम्प, शिव शंभो मित्र मंडळ पिंपरी, श्री नव चैतन्य तरुण मंडळ पिंपरी, संग्राम मित्र मंडळ पिंपरी, श्री सुनील पाथरमल भीमनगर, शिव शक्ती तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ, कैलास मित्र मंडळ कैलास नगर पिंपरी, इंडीयन बॉय मित्र मंडळ, नव चैतन्य तरुण मित्र मंडळ, कोहिनूर मित्र मंडळ या मंडळांच्या गणपतीचे विसर्जन झाले.

चिंचवड येथील चापेकर चौकात देखील महापालिकेव्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित आदी उपस्थित होते.

लालबहादूर शास्त्री भाजी मंडई मित्र मंडळाचे यंदा 45 वे वर्ष आहे. मंडळाने मिरवणुकीत ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर फुलांची उधळण केली. आकर्षक फुलांची सजावट केलेल्या रथातून बाप्पाची मिरवणूक काढली.

फुल मार्केटचा राजा गणेश मित्र मंडळाने ढोल ताशाच्या गजरात फुलांची उधळण करून मिरवणूक काढली. 

पिंपरी चिंचवड मधील गणेश विसर्जन सव्वा दोन वाजता पूर्ण
पिंपरी चिंचवड आणि आसपासचा परिसरातील (चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, महाळुंगे अन् म्हाळुंगे) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विसर्जन मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी पूर्ण झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest