संग्रहित छायाचित्र
'मतदार राज जागा हो, लोकशाहीचा धागा हो', 'जन जन का यही नारा, मतदान है अधिकार हमारा', 'ज्येष्ठ असो की जवान, सर्वांनी करा मतदान' अशा घोषणांनी शहरातील विविध मॉल्सचा परिसर दुमदुमला. यावेळी मतदार जनजागृती अभियानात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेऊन निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली.
पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुषंगाने रविवारी शहरातील विविध मॉल्समध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत मतदान करणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या वतीने विविध मॉलमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
मतदार जनजागृतीपर संगीत नृत्याचे सादरीकरण जीएनडी ग्रुपच्या बाल कलाकारद्वारे करण्यात येत आहे. आकर्षक नृत्य व चित्तथरारक शारीरिक कवायती या बाल कलाकारांकडून सादर करण्यात येत आहेत. या कलाकारांना नागरिकांकडून कौतुकाची दाद आणि प्रशंसा मिळते आहे. तसेच ज्येष्ठ कलाकारांकडून मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात येत आहे. नागरिकांना विविध माध्यमातून मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात येत असून सर्व मतदारांनी आपला मताचा अधिकार बजावावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.