संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील फायरमन रेस्क्युअर या पदाकरिता घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परिक्षेची उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर उमेदवारांकडून आलेल्या हरकती व आक्षेपांचे निरसन केल्यानंतर हा निकाल जाहीर केला आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या अग्निशमन भरती अंतर्गत अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्यूअर पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता उमेदवारांची २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. ही परिक्षा दिलेल्या १८९३ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्या आला आहे. दरम्यान, या पदाकरता आवश्यक असलेली शारिरीक क्षमता मैदानी चाचणी घेण्याकरिता शैक्षणिक अर्हतेनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता आरक्षण निहाय उमेदवारांचे नाव व वेळापत्रक कट ऑफ महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.