Pimpri Chinchwad: पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प

पिंपरी चिंचवड: शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. या तिन्ही नद्यांच्या प्रदूषण पातळीत प्रचंड वाढ होऊन अतिप्रदूषित झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पवना, इंद्रायणी आणि मुळा

संग्रहित छायाचित्र

महापालिका अर्थसंकल्पात २९११ कोटी खर्च अपेक्षित

पिंपरी चिंचवड: शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. या तिन्ही नद्यांच्या प्रदूषण पातळीत प्रचंड वाढ होऊन अतिप्रदूषित झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पवना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी २९११ कोटी खर्च अपेक्षित त्यांची तरतूद करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतल्यावर तरी या नव्या प्रदूषणमुक्त होणार का याकडे लक्ष लागले आहे.   (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड हद्दीमधील मुळा नदीच्या सुमारे १४.२० किलोमीटर लांबीसाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा ७५० कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात वाकड ते सांगवी फाटापर्यंत ८.८० किलोमीटर लांबीसाठी ३२० कोटी रकमेचा प्रकल्प सन २०२४-२०२५  या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येत आहे. पवना नदीच्या पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये असणाऱ्या सुमारे २४.४० किलोमीटर लांबीसाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा १ हजार ४८४ कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा  प्रकल्प देखील सन २०२४-२०२५  या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येत आहे. (Pimpri Chinchwad Rivers) 

इंद्रायणी नदीच्या पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये येणाऱ्या सुमारे २०.६० किलोमीटर लांबीसाठी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा १ हजार १०७ कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प देखील सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पांपैकी मुळा नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २०० कोटी रकमेचे 

कर्जरोखे (मनपा निधी ) उभारण्यात आले आहेत. पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. तीनही प्रकल्पांमुळे नदीचे प्रदूषण कमी होऊन नदीच्या जैवविविधतेत सुधारणा होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest