संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: शहरात नव्याने बदलून आलेल्या १३ पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. याबाबत पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) माधुरी केदार-कांगणे यांनी गुरुवारी (७ मार्च) आदेश दिले आहेत. (Pimpri Chinchwad Police)
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांची विविध घटकांमध्ये बदली करण्यात आली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात १३ पोलीस निरीक्षक बदली होऊन आले आहेत. त्यांची नियंत्रण कक्ष येथून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत या पोलीस निरीक्षकांना कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सध्या बदली आदेशाच्या विरोधात काही अधिकारी मॅटमध्ये गेले आहेत, तर बदली आदेशाला मॅटने स्थगिती दिली होती. मात्र, या आदेशाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या सगळ्यांवर १३ किंवा १४ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुन्हा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.
नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक (नेमणुकीचे ठिकाण)
l अशोक कडलग (पिंपरी पोलीस स्टेशन)
l शत्रुघ्न माळी (निगडी पोलीस स्टेशन)
l निवृत्ती कोल्हटकर (वाकड पोलीस स्टेशन)
l कन्हैया थोरात (हिंजवडी पोलीस स्टेशन)
l प्रदीप रायन्नावार (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन)
l अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन)
l जितेंद्र कोळी (चिंचवड पोलीस स्टेशन)
l प्रमोद वाघ (चाकण पोलीस स्टेशन)
l नितीन गीते (महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन)
l विजय वाघमारे (देहूरोड पोलीस स्टेशन)
l सुहास आव्हाड (गुन्हे शाखा)
l गोरख कुंभार (गुन्हे शाखा)
l संदीप सावंत (गुन्हे शाखा)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.