पिंपरी-चिंचवड: आपत्तीप्रवण स्थळांवर सूचनाफलक लावा

नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका हद्दीतील परिक्षेत्रातील संभाव्य आपत्तीप्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरिकेड्स लावावेत. कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी विभाग प्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Edited By Admin
  • Wed, 3 Jul 2024
  • 12:19 pm
pimpri chinchwad , notice boards, barricades, Chandrakant Indalkar, Joint Commissioner, accident takes place.

संग्रहित छायाचित्र

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज, सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना

नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका हद्दीतील परिक्षेत्रातील संभाव्य आपत्तीप्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरिकेड्स लावावेत. कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी विभाग प्रमुख आणि  क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी होत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महापालिका क्षेत्रात संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी तत्काळ आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील नदी घाट ,पूल, तलाव, बंधारे, उद्याने, खाणी अशा ठिकाणी नागरिक पावसाळी पर्यटनासाठी येतात. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. गरजेच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणे,

तसेच धोकादायक झाडे, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक फलक, मनोरे, इमारती, विजेचे डी.पी.बॉक्स व ट्रान्सफार्मर संदर्भात संबंधित सर्व विभाग प्रमुख आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूर्व दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहआयुक्त इंदलकर यांनी दिल्या.  

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांची पाणी पातळी वेळोवेळी तपासण्यात येत आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी २४ तास कार्यरत असलेले 'आपत्कालीन प्रतिसाद पथक' स्थापन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी या पथकाशी संपर्क साधावा.

- चंद्रकांत इंदलकर, सह-आयुक्त महापालिका, पिंपरी-चिंचवड

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest