Pimpri Chinchwad: एसटीच्या अपघातांना लावला ब्रेक

पिंपरी-चिंचवड : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रशासनाने वाहनाच्या वाढत्या अपघातावर ब्रेक लावला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एकमेव व महत्त्वाच्या वल्लभनगर आगारात चालू वर्षात सात अपघाताची नोंद झाली आहे

संग्रहित छायाचित्र

वल्लभनगर आगारात वर्षभरात केवळ सात अपघातांची नोंद

पंकज खोले-

पिंपरी-चिंचवड : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रशासनाने वाहनाच्या वाढत्या अपघातावर ब्रेक लावला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एकमेव व महत्त्वाच्या वल्लभनगर आगारात चालू वर्षात सात अपघाताची नोंद झाली आहे. ती गेल्या वर्षात जवळपास ५० टक्क्यांनी घटले आहे. वल्लभनगर आगार प्रशासनाचे नियोजन, चालकांना दिलेले प्रशिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे चालकांवर कंट्रोल करणे सोपे जात आहे. परिणामी, अपघातात घट झाली असल्याचे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Pimpri Chinchwad News)

एसटीचा अपघात ही नित्याचीच ठरलेली बाब आहे. चालकांकडून अपघातांचे प्रमाण पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रशासनाची एसटीचा अपघात झाल्यास मोठी डोकेदुखी ठरवायची. कारण, या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी अखेर आगारप्रमुखांवर त्यास कारणीभूत अनेकदा विभागाच्या आगार प्रमुखांना जबाबदार धरले जात होते. त्या कारणावरून अनेकदा आगर प्रमुखांची बदलीही करण्यात येते. मात्र वल्लभनगर आगाराने वाढत्या अपघाताच्या आलेखावर केवळ नियंत्रण नव्हे तर, तो निम्म्याहून कमी आणला आहे. गेल्यावर्षी अर्थात २०२२-२३ या कालावधीत वल्लभनगर आगारातील अपघाताचे प्रमाण हे जवळपास 14 होते. तसेच चालकांची निष्काळजीपणा त्यात कारणीभूत असल्याचा निष्कर्षही काढला होता परंतु या वर्षामध्ये म्हणजेच २०२३-२४ या वर्षात फेब्रुवारी पर्यंत केवळ सात अपघाताची नोंद झाली आहे. त्यामुळे एसटीचे होणारे अपघातावर नियंत्रण मिळवले असून, सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यास एसटीची ऐट वाढली आहे.

चालकांमध्ये होणारी सुधारणा,  वाहतूक व वाहनासंबंधित देण्यात येणारे प्रशिक्षण, आरटीओ अधिकाऱ्यांकडून मिळणारे मार्गदर्शन आणि चांगले वातावरण यामुळे अपघाताची संख्या कमी करण्यास यश आल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात. सध्या  वल्लभनगर विविध जिल्ह्यातील मार्गावर ६२ फेऱ्या होतात. बसची संख्या ५० असून, त्यातील बहुतांश एसटी या मार्गावर असतात.

आगारातून नाशिक, पंढरपूर  सुसाट

वल्लभनगर येथील आगारातून नाशिक आणि पंढरपूर या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी आगारातून प्रत्येकी तीन ते चार फेऱ्या होतात. तर, त्यापाठोपाठ पणजी,हैदराबाद, विजापूर या फेरीलाही मोठी मागणी आहे. कोकण मार्गावर चिपळूण, वेळास, तिवरे, गुहागर या ठिकाणीही प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.

वाहने कालबाह्य,चालक तरबेज

एसटीतील बहुतांश वाहनांनी आठ ते दहा लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. वल्लभनगर आगारात दोन एसटी बसने किलोमीटरची मर्यादा ही ओलांडली आहे. काही बसेस अगदीच कालबाह्य झाले आहेत.. मात्र तरीही चालकांनी अगदी व्यवस्थित बस हाताळून प्रवासी सुखरूप पोहोचवत आहेत.

तीन महिन्यात अपघात नाहीत

चालू वर्षातील गेल्या तीन महिन्यात एकही अपघाताची नोंद नाही. जानेवारी महिन्यात वाहनांची फेऱ्यांची संख्या वाढली होती.. मात्र, या महिन्यात एकही अपघात झाल नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये एका अपघाताची नोंद आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest