संग्रहित छायाचित्र
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस दवाखाना सुरू केला आहे. दवाखान्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पोलीस हे २४ तास ऑनड्युटी राहतात. त्यांच्या प्रकृतीवर अनेकदा परिणाम होतो. आजार देखील उद्भवतात. त्यामुळेच अशा सुसज्ज असा पोलीस दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
पोलीस म्हणालो की,ताण तणाव हा नक्कीच असतो. भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी सण-उत्सव सर्वात जास्त साजरे केले जातात आणि याच सण- उत्सवात सुरक्षेची जबाबदारी आणि काही अनिश्चित प्रकार घडू नये म्हणून पोलीस हे तत्पर राहतात. यामुळेच ते अनेकदा त्यांच्या कुटुंबासमवेत सण आणि उत्सव देखील साजरे करत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते २४ तास कार्यरत असतात. कामाचा ताण आणि शारीरिक, मानसिक थकवा आल्याने स्वतःकडे देखील लक्ष देण्याची वेळ पोलिसांकडे बहुतांशदा नसते. अनेक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. हेच हेरून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाकड परिसरातील कावेरी नगर येथे पोलीस दवाखाना कार्यान्वित केला आहे.
या हॉस्पिटलसाठी डॉ. राधाकृष्ण पवार यांचे मोलाचे योगदान लाभलं आहे. वैद्यकीय अधिकारी श्रीमती अनुपमा कांबळे, डॉ. संजय भारती यांच्यासह आठ जणांचा स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.