पिंपरी-चिंचवड : पीएमआरडीए कार्यालयाची विस्कटलेली घडी बसवणार

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएची सध्या विस्कटलेली घडी बसवण्यात येणार असून, प्राधिकरणातील प्रलंबित विशेषतः नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर प्राधिकरणाचा आढावा घेतला. एकूण मनुष्यबळ, प्राधिकरणातील प्रकल्प, रखडलेले प्रश्न या सर्वांची माहिती मागवण्यात आलेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Mon, 1 Jul 2024
  • 11:22 am
pimpri chinchwad news, PMRDA

पीएमआरडीए कार्यालयाची विस्कटलेली घडी बसवणार

नूतन आयुक्त योगेश म्हसे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएची सध्या विस्कटलेली घडी बसवण्यात येणार असून, प्राधिकरणातील प्रलंबित विशेषतः नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर प्राधिकरणाचा आढावा घेतला. एकूण मनुष्यबळ, प्राधिकरणातील प्रकल्प, रखडलेले प्रश्न या सर्वांची माहिती मागवण्यात आलेली आहे.

प्राधिकरणाच्या आयुक्तपदी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लागलीच बजेटपासून ते उपलब्ध मनुष्यबळापर्यंत सर्वच माहिती मागवली आहे. पूर्वीचे प्राधिकरण म्हणजेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण याचे विलीनीकरण झाल्यानंतर पीएमआरडीएच्या कामकाजामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नवी जबाबदारी असल्याचे सांगून म्हसे म्हणाले की, माझ्या कामाची पद्धत जरा वेगळी आहे. त्यामुळे प्राधिकरणाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्राधिकरणाचे कामकाजाची गती वाढवण्यात येईल. विशेष म्हणजे केंद्राकडे आणि राज्य शासनाकडे काही प्रकल्प प्रलंबित असल्याने ते सुद्धा सोडवण्याबाबत प्रयत्न करणार आहे. मेट्रो, गृहप्रकल्प याचीही माहिती घेण्यात येणार असून, त्यातीलही काही त्रुटी असल्यास त्या सोडवण्यात येतील.

दरम्यान, आयुक्तांनी प्राधिकरणाचे बजेट आणि सध्या सुरू असणाऱ्या प्रकल्पांची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून घेतली. आता प्राधिकरणात जुने-जाणते अधिकारी अगदी बोटाच्या मोजण्याइतपत आहेत. ज्यांना प्राधिकरणाची सर्व माहिती आहे.  त्याचप्रमाणे त्यांना माझ्या कामाची देखील माहिती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात प्राधिकरणात बदल दिसून येईल. प्रत्येक अधिकारी आपले काम चोखपणे पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

प्राधिकरणाला मिळणार जनसंपर्क अधिकारी

प्राधिकरणातील प्रकल्प आणि एकूणच नागरिकांना आवश्यक असणारी माहिती पोहोचत नाही. त्यामुळे प्राधिकरणात काय काम चालू आहे, हे अनेकांना समजून येत नाही. त्यासाठी प्राधिकरणाची माहिती प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest