Pimpri Chinchwad News: शेतीमाल हमीभाव कायद्यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड: शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले असून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवरच रोखण्यात आले आहे.

शेतीमाल हमीभाव कायद्यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) पाठिंबा : नखाते

विकास शिंदे

पिंपरी चिंचवड:  शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले असून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवरच रोखण्यात आले आहे. आंदोलनाच्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ड्रोनद्वारे अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, बॅरिकेडसह सिमेंटचे गट्टूही बसवण्यात आले. हे सर्व अडथळे पार करून शेतकरी आंदोलनात यशस्वी होतील असा विश्वास राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यानी व्यक्त केला. (Pimpri Chinchwad News)

आकुर्डी येथील थरमॅक्स चौकात निर्देशने करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी (शरद चंद्र पवार गट) काॅंग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटोळे,  निमंत्रक नाना कसबे, सलीम डांगे, अरुण जाधव, राजेश माने, विकास माने, सुधीर कांबळे, मनोज यादव, तुषार मोरे , अर्चना कांबळे, सविता जाधव , वनीता कदम आदी उपस्थित होते.

नखाते म्हणाले की,  नवी दिल्लीत यापूर्वी एक वर्षापेक्षा अधिक काळ हे आंदोलन झाले, त्या दरम्यान केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याला चिरडून मारले होते. दिल्ली येथे ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे अखेर सरकार झुकले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या. कायदा मागे घेत असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. मात्र आजही त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले नाही किंवा आदेश काढण्यात आलेले नाही. म्हणून शेतीमालाला हमीभावाच्या कायद्यासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर व्हाव्यात या आणि इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कृषी विषयक तीन कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले. अखेर ते शेतकरी विरोधामुळे मागे घेतले. देशातील शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन पुकारले होते. आता पुन्हा एकदा सहा महिन्यांचा शिदा सोबत घेऊन शेतकरी पुन्हा दिल्लीकडे निघाला आहे. आंदोलनादरम्यान शुभकिरण सिंग व दर्शन सिंग या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांना बंदुकीच्या गोळीद्वारे मारण्यात येईल. मात्र,  आंदोलक परत फिरणार नसून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर राज्य सरकारकडून खूप मोठा अन्याय होत असून आजही महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.

कांद्यावरील निर्यात शुल्क असो अथवा शेतीमालाला हमीभाव असो, तो मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. नापिकी व दुष्काळामुळे अनेक गंभीर समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत याचा जाब सरकारला विचारतील, असेही ते म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest