पिंपरी-चिंचवड : राज्य सरकारचा जुमल्याचा पाऊस सुरूच: सुप्रिया सुळे

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतले. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडी येथील तुकोबांच्या पालखीचा विसावा संपल्यावर पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Mon, 1 Jul 2024
  • 11:30 am
pimpri chinchwad, Sant Tukaram Maharaj

राज्य सरकारचा जुमल्याचा पाऊस सुरूच: सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र, पती सदानंद सुळे यांच्यासह घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतले. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडी येथील तुकोबांच्या पालखीचा विसावा संपल्यावर पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी दापोडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पती सदानंद सुळे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारतर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिले जाणार अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशाप्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पडत राहणार आहे. निवडणुका जवळ आल्याने या सरकारला लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आठवत आहेत. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्यांचा आमचा अभ्यास सुरू आहे, असे सुळे म्हणाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात होणाऱ्या प्रवेशाविषयी बोलणे त्यांनी टाळले. 

इंद्रायणीचे प्रदूषण हे अत्यंत दुर्दैवी असून शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे देखील इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितले. बीडमधील तणावग्रस्त परिस्थिती हे गृह विभागाचे अपयश असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest