Pimpri Chinchwad : उमेदवारी अर्ज भरू नको म्हणत जीवे मारण्याची धमकी; राहुल कलाटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चाललेल्या उमेदवाराला तु अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, अशी दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Tue, 29 Oct 2024
  • 11:38 pm
 Rahul Kalate

Pimpri Chinchwad : उमेदवारी अर्ज भरू नको म्हणत जीवे मारण्याची धमकी; राहुल कलाटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चाललेल्या उमेदवाराला तु अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, अशी दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्या हातातील निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमधून खाली फेकून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना थेरगाव येथील महापालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर मंगळवारी (दि. २९) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, भाजपच्या एक स्थानिक माजी नगरसेवकाच हे षडयंत्र असून, पोलिसांनी सत्यता तपासावी अशी मागणी करीत सत्ताधारी पक्षाचे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा दावा राहुल कलाटे यांनी केला आहे.

जावेद रशीद शेख (वय ३५, रा. आदर्श कॉलनी, वाकड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे (वय ४८) यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जावेद शेख हे वंचित बहूजन आघाडी

पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चालले होते. यावेळी कलाटे यांनी शेख यांना उद्देशून तु कशाला अर्ज भरतोय, तु अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, असे म्हणत शेख यांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्या हातातील निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमधून खाली फेकून दिली. फौजदार बालाजी मेटे तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest