Pimpri-Chinchwad: दीडशे पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए मधील विविध पदांच्या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या आकृतीबंदला राज्य सरकारने यापूर्वी मंजुरी दिलेली होती. त्यानंतर आता सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता एमपीएससी आणि जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून जवळपास दीडशे पदांची पदभरती लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून पुढील कार्यवाही होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 01:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पीएमआरडीएमध्ये मनुष्यबळ वाढीसाठी राज्य शासनाचा सकारात्मक प्रतिसाद, जिल्हा निवड समितीमार्फत होणार भरती

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए मधील विविध पदांच्या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या आकृतीबंदला राज्य सरकारने यापूर्वी मंजुरी दिलेली होती. त्यानंतर आता सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता एमपीएससी आणि जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून जवळपास दीडशे पदांची पदभरती लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. यानंतर प्राधिकरणाला स्वतंत्र मनुष्यबळ प्राप्त होईल. 

पीएमआरडीएची ३१ मार्च २०१५ रोजी स्थापना झालेली आहे. पीएमआरडीए हद्दीत ८१७ गावांचा समावेश आहे. पीएमआरडीएचे क्षेत्र सुमारे ७ हजार २५६ चौरस किलोमीटर इतके आहे. पीएमआरडीएच्या स्थापनेपासून वरिष्ठ पदांवर विविध विभागातील अधिकार्यांची प्रतिनियुक्तीने तात्पुरती नियुक्ती केली जात होती. तर, कारकून, शिपाई ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत होती. 

प्राधिकरणात क्लास वन ते शिपाई या पदापर्यंत वेगवेगळ्या विभागामध्ये पदांची आवश्यकता आहे. त्यानुसार मागणी पत्र सादर करण्यात आले होते. त्यापैकी विधी अधिकारी, लिपिक, मुख्य विधी अधिकारी, शाखा अभियंता या पदांसाठी शासनाकडे माहिती पाठवली असून, ती पदे एमपीएससी मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने पीएमआरडीएच्या आकृतीबंधाला मंजुरी दिली होती. मात्र, सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरणाच्या (विनियम २०२३) पीएमआरडीएतील पद भरतीप्रक्रिया नियमावलीला मंजुरी प्रलंबित होती. त्यानंतर नगरविकास विभागाचे सहसचिव यांनी शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे पीएमआरडीएकडून विविध विभागांतील सेवा नियमावली तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान या पदांपैकी काही पदेही जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या दोन कंपन्यांच्या मार्फत त्या पदांची माहिती पाठवण्यात आलेली आहे. त्यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ आरेखक, सर्वे रियर, वाहन चालक आणि शिपाई या पदांचा समावेश आहे. त्यामुळे ही पदे भरण्याबाबत प्राधिकरणाच्या मार्फत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. 

अग्निशमन विभागाची पदे भरणार 

अग्निशमन विभागाच्या विविध पदांची कमतरता आहे. सध्या कंत्राटी कर्मचारी मार्फत कामकाज सुरू आहे. त्यामुळे अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी यांची पदे देखील नव्याने भरण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचनालय या मार्फत ही पदे भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन साठी आवश्यक असणारे वाहने आणि इतर साहित्य देखील खरेदी करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात मध्ये जिल्ह्यातील प्राधिकरणातील अनिशमन विभाग अधिक सक्षम होऊ शकेल.

Share this story