पिंपरी-चिंचवड: महिलेच्या पोटातून काढली कापसाची पिशवी

मूल पोटातच दगावल्याने हैद्राबाद येथील शासकीय रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात कॉटन मॉब (कापसाची पिशवी) राहिली. या महिलेच्या पोटात कॉटन मॉब असल्याचे वायसीएममध्ये निदान झाले. त्यानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करून तब्बल ३० चौरस सेंटीमीटर मॉब काढला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Edited By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 01:03 pm
Pimpri-Chinchwad, YCM hospital, cotton mob,

संग्रहित छायाचित्र

वायसीएम रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून काढला ३० चौरस सेंमीचा मॉब

मूल पोटातच दगावल्याने हैद्राबाद येथील शासकीय रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात कॉटन मॉब (कापसाची पिशवी) राहिली. या महिलेच्या पोटात कॉटन मॉब असल्याचे वायसीएममध्ये निदान झाले. त्यानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करून तब्बल ३० चौरस सेंटीमीटर मॉब काढला.

आकुर्डी येथील एक २४ वर्षीय महिला आपल्या पतीसोबत हैद्राबाद येथे राहत होती. ती नऊ महिन्यांची गरोदर असताना बाळ पोटातच दगावले. त्यामुळे हैद्राबाद येथील निलोफर या शासकीय रुग्णालयात २२ मे रोजी तिची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया केल्यावर ती आकुर्डी येथे आपल्या माहेरी आली. त्यानंतर तिचे पोट दुखू लागले. महिलेने स्थानिक डॉक्टरांना दाखवले असता स्थानिक डॉक्टरांनी तिला गोळ्या दिल्या. मात्र पोटदुखी न थांबल्याने त्या जवळच्या खासगी रुग्णालयात गेल्या. तिथे सोनोग्राफी केल्यावर पोटात काहीतरी असल्याचे दिसून आले. पोटात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोटाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी तिच्या पोटात मॉब असल्याचे निदान झाले. आकुर्डी रुग्णालयात डॉक्टर बालाजी धायगुडे, डॉ. संतोष थोरात यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेच्या वेळी भूलतज्ज्ञ डॉ. मनिष सपाटे व स्वप्ना काळे यांनी प्रमुख भूमिका बजावली. तसेच डॉ. अक्षय म्हसे यांनी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.

शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव थांबावा व बाळाने पोटात केलेली घाण काढण्यासाठी या मॉबचा वापर केला असावा. मात्र शस्त्रक्रियेनंतर तो मॉब पोटातून काढण्यास तेथील डॉक्टर विसरले. महिनाभर हा मॉब पोटात राहिल्याने तो पोटातील लहान आतड्यांना चिकटला. मॉब चिकटल्याने पोटातील आतडी फाटली. लहान व मोठी आतडी आम्ही व्यवस्थित केली. आता ती महिला सुखरुप आहे.

- डॉ. संतोष थोरात, सर्जन, वायसीएम रुग्णालय

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest