पिंपरी-चिंचवड: अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल भाजपकडून आनंदोत्सव

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मोरवाडी मध्यवर्ती कार्यालयाजवळ शहर पदाधिका-यांनी एकत्रित येत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 7 Oct 2024
  • 01:03 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल भाजपकडून आनंदोत्सव

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मोरवाडी मध्यवर्ती कार्यालयाजवळ शहर पदाधिका-यांनी एकत्रित येत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी 'मी मराठी, आम्ही मराठी', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस संजय मंगोडेकर, रवी देशपांडे, प्रदीप बोन्द्रे, मंडलाध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, योगेश चिंचवडे, भगवान निकम, प्रसन्न अष्टेकर, विजय शिनकर, कोमल शिंदे, ॲड. दत्ता झुळूक, महेंद्र बाविस्कर, महेश बालकवडे, राकेश नायर, मंडलाध्यक्षा पियूषा पाटील, दीपक भंडारी, जनार्धन तालेरे, नीलेश जगताप, सचिन बंडी, दीपाली बेलसरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदेव ढाके म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाचे खरे श्रेय महाराष्ट्रातील संत परंपरेला आहे. ज्यांनी आपल्या ग्रंथ, पोथी, ओव्या आणि वाड्मयाद्वारे रचलेल्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। या शब्दांमधून मराठी भाषेविषयी असलेले प्रेम आणि अभिमान प्रत्येक मराठी जनांमध्ये रुजविला. त्यांच्या या योगदानामुळेच आज आम्हाला या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होता आले.

Share this story

Latest