पिंपरी-चिंचवड: अमित गोरखे यांनी भरला विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी आज (मंगळवारी) विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Edited By Admin
  • Wed, 3 Jul 2024
  • 01:43 pm
pimpri chinchwad,  Amit Gorkhe,  Legislative Council elections, BJP, pcmc got 5mla

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहराला मिळणार पाच आमदार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी आज (मंगळवारी) विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधान परिषदेचा अर्ज अमित गोरखे यांनी दाखल केला. यावेळी भाजप आमदार माधुरी मिसाळ ,आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, अमित यांच्या आई अनुराधा गोरखे उपस्थित होते. गोरखे यांची सोमवारी उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर आज त्यांनी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती. त्यामुळे गोरखे यांनी आपला उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला. भाजकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर यांनी अर्ज भरला आहे. भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. गोरखे हे निवडून आल्यास पिंपरी-चिंचवड शहराला विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे दोन असे पाच आमदार मिळणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest