PCMC News: महापालिका आयुक्तांचा कारभार सुसाट

पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत शहरातील विविध विकासकामांना स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली,

PCMC News

महापालिका आयुक्तांचा कारभार सुसाट

स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विकासकामांना दिली मंजूरी, शहरातील देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग

पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत शहरातील विविध विकासकामांना स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापालिकेच्या 'फ' प्रभागातील क्रिडा स्थापत्यविषयक किरकोळ कामे करण्यासाठी तसेच महापालिका 'क', 'ड', 'ग', 'फ', 'इ' प्रभागमधील उद्यानांची स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जुनी सांगवीमधील मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. ३२ मधील सांगवी परिसरातील मनपा इमारती, स्वच्छतागृह व इतर इमारतींची स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी आणि महापालिका प्रभाग क्र. २० संत तुकारामनगरमधील वायसीएम हॉस्पिटलमध्ये स्थापत्यविषयक व फर्निचर विषयक कामे करण्यासाठी आणि महापालिका प्रभाग क्र. १० शाहूनगर व इतर परिसरात पावसाळी गटर्स, स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख येथील मनपा दवाखाना, व्यायामशाळा व तालीम यांचे नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच पिंपळे गुरव परिसरात जलनि:सारण विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. २, ६, ८, ९ मध्ये औष्णिक धुरीकरण करण्यासाठी वॅन फॉग मशिन ठेवून कामकाज करण्यासाठी आवश्यक डिझेलवर चालणारे तीनचाकी रिक्षा टेम्पो वाहनचालकासह भाड्याने घेण्यासाठी तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या विविध विभागांसाठी आवश्यक संगणक स्टेशनरी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. १८ मधील पावसाळी पाण्याच्या नलिकांची डागडुजी करणे व साफसफाई करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. १६ रावेत वाल्हेकरवाडी व किवळे मधील अनाधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यासाठी व इतर स्थापत्य विषयक कामासाठी मशिनरी पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेचे प्रभाग क्र. ९ आण्णासाहेब मगर स्टेडियमसमोरील दिवाणी न्यायालयाचे स्थापत्यविषयक देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच बीआरडीएस कॉरीडॉर– १ मार्गाचे सेवा रस्ते व फुटपाथ, डेडीकेटेड लेन, बस स्टॉपची दुरूस्ती अनुषंगिक आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार केलेल्या  कामांची अत्यावश्यक दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. १० मधील महापालिका इमारतीचे  स्थापत्य विषयक व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि विद्यानगर, संभाजीनगर मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख येथील कावेरीनगर, पोलीस वसाहतीमधील उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तसेच कासारवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाचे नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील पवार वस्ती व भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ते पावसाची पाईपलाईन टाकून डांबरीकरण करण्यासाठी तसेच वैद्यकीय विभागाच्या थेरगाव व भोसरी रुग्णालयातील नेत्ररोग विभागासाठी ओसीटी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३ मार्च २०२४ अंतर्गत 'आयपीपीआय'साठी लस, साहित्य व मनुष्यबळ वाहतुक तसेच पर्यवेक्षकीय कामकाजासाठी सुमो/जीप किंवा तत्सम वाहने उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रभाग क्र. ९ मधील परिसरातील रस्त्यांचे चर डब्ल्यु.एम.एम व बी.बी.एम पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. सन २०२३-२४ साठी फुगेवाडी व दापोडी परिसरात मुख्यालय स्तरावर डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण भागातील महापालिका शाळा इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रातंर्गत प्रभाग क्र. ८ मध्ये जलनि:सारण नलिका व मॅनहोल चेंबर्सचे वार्षिक देखभाल दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीस मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाची सुशोभिकरणाची व इतर स्थापत्यविषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच मंजुर विकास योजनेतील रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकत धारकास खाजगी वाटाघाटीने देण्यासाठी येणाऱ्या खर्चास आणि पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपुल बांधणे कामी नियोजित उड्डाणपूल बांधकामास अडथळा ठरत असलेले वृक्ष तोडण्यासाठी, वृक्षांच्या मुल्यांकनाची रक्कम संरक्षण विभागासोबत झालेल्या करारानुसार संरक्षण विभागास जमा करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालय निहाय कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करण्यासाठी तसेच शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा व माध्यमिक विभागाचे माध्यमिक विद्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) यांचे इमारती, परिसराची दैनंदिन साफसफाई करणे व इमारतीमधील स्वच्छतागृहांची यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

'क', 'ब' प्रभागातील क्रिडा स्थापत्यविषयक किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ तळवडे येथील बाठेवस्ती, लक्ष्मीनगर, संत तुकारामनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणेवस्ती, म्हेत्रेवस्ती, धनगरबुवा भागात जलनि:सारण नलिकांची व चेंबर्सची देखभाल दुरूस्तीची कामे करणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि रावेत, शिंदे वस्ती व इतर परिसरामध्ये जलनि:सारण नलिका बदलणे व ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. सन २०२३-२४ करिता 'इ' क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भोसरी, दिघी, बोपखेलमधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणे व डांबरी रस्त्याखाली गेलेले चेंबर्स रस्त्याच्या समपातळीस घेण्यासाठी तसेच राष्ट्रीय नागरी सुधारणा अंतर्गत (अमृत) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबविणे (अमृत योजना टप्पा-२) अंतर्गत विद्युत यांत्रिकी विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

गणेश तलाव से.नं. २६ प्राधिकरण, निगडी येथील २ लॉनटेनिस हायकोर्ट भाड्याने चालविण्यात देण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील पदव्युत्तर शिक्षण संस्थेच्या ११ मजली नवीन इमारतीकरिता महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) मार्फत यांच्याकडील १७ सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीबाबत करारनामा करून येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.  केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली येथे निवासी गाळे बांधणे प्रकल्पातील मूलभूत सुविधा पुरवणे कामांतर्गत विद्युत विषयक कामे करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. ९ मधील परिसरातील आवश्यक ठिकाणी किरकोळ देखभाल दुरूस्तीची कामे करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि प्रभाग क्र. २ जाधववाडी गट नं. ५३९ येथील सावतामाळी मंदिराशेजारील सांस्कृतिक केंद्र परिसरातील स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर मधील वायसीएम हॉस्पिटल बाहेरील रंगरांगोटी व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. २५ वाकड येथील शंकर कलाटेनगर परिसरात व इतर भागात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण विभागातील से. २४ निगडी गावठाण व इतर परिसरातील डांबरी रस्त्याची दुरूस्तीची कामे करण्यासाठी प्रभाग क्र. २४ थेरगाव येथील आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी परिसर व इतर परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील काटेवस्ती व कुंजीरवस्ती येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. २७ रहाटणी येथील विविध रस्ते बीएम व बीसी पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मतदार संघातील प्रभाग क्र. २३ प्रसूनधाम ते डी मार्टपर्यंत जाणारा रस्ता  विकसित करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. ४ मध्ये दिघी भागात फायर स्टेशन बांधण्यासाठी आणि प्रभाग क्र. ४ दिघी गावात नव्याने ताब्यात आलेले रस्ते विकसित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत मान्यता दिली.

या स्थायी समिती बैठकीच्या वेळी २९ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणारे कार्यकारी अभियंता थॉमस नऱ्होना यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांनी महापालिकेत ३५ वर्षे ५ महिने इतकी सेवा केली आहे. वायरलेस ऑपरेटर, वायरलेस मॅकेनिक, वायरलेक इनचार्ज आणि कार्यकारी अभियंता या पदावर त्यांनी कामकाज केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest