संग्रहित छायाचित्र
भोसरी: निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दोन सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १८) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गवळी माथा रस्ता, एमआयडीसी भोसरी येथे घडली.
शांतीरत्न उर्फ माऊली अण्णासाहेब सोनवणे (वय १९, रा. एमआयडीसी भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर ओम कांबळे आणि रोहित गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सावंतकुमार मल्हारी गायकवाड (वय ३३, रा. एमायडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीरत्न सोनवणे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवली. गवळी माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना त्याची दुचाकी घसरली. यामध्ये शांतीरत्न याचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील सहप्रवासी ओम कांबळे आणि रोहित गायकवाड हे गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.