चिखलीतील आग शॉर्ट सर्किटमूळे लागली नाही, महावितरणचे स्पष्टीकरण
पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीमध्ये पूर्णानगर येथे बुधवारी (दि. ३०) पहाटे सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानात आग लागली. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीबाबत माहिती मिळताच पहाटे ६ च्या सुमारास इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यात महावितरणकडून दुकानात लावलेल्या मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. सोबतच महावितरणच्या यंत्रणेमधून कोणत्याही प्रकारचे शॉर्टसर्किट झाले नसल्याचे या प्राथमिक पाहणीत आढळून आले. दुकानातील आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त होत असल्याने राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेची पुढील चौकशी विविध सरकारी यंत्रणेच्या संयुक्त समितीकडून करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.