लिंक रोड, चिंचवड स्टेशन, आनंदनगर येथे आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 16) लिंक रोड चिंचवड, आनंदनगर, गवळी वाडा येथे प्रचार फेरी काढली. यावेळी उपस्थितांनी आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा आमदार होतील, असा सूर आवळला. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून महिला आणि ज्येष्ठांनी आमदार अण्णा बनसोडे यांना आशीर्वाद दिले.
चिंचवड स्टेशन येथील गावडे पार्क, गावडे कॉलनी, भोईर कॉलनी, सुदर्शन नगर, गोलांडे कॉलनी, गणेश नगर, श्रीधर नगर, गोलांडे इस्टेट, गावडे नगर, लक्ष्मी नगर, देवधर सोसायटी, जीवन नगर, धोका कॉलनी, एसकेएफ कॉलनी येथे प्रचार सभा काढली.
यावेळी आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, शितल शिंदे, निलेश डोके, राजेंद्र साळुंखे, जयश्री गावडे, दीपक मेवानी, अनिकेत गावडे, महेश कुलकर्णी, प्रसाद शेट्टी, शैलेश मोरे, अपर्णा डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.
आनंदनगर येथील प्रचार फेरीत शैलेश मोरे, हरीश ललवाणी, मनोहर पाटील, दीपक मेवाणी, जयश्री गावडे, जयदीप ठाकरे, प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, प्रदीप साळवे, ज्योती शिंदे, रशिकांत कदम, किरण गायकवाड, राजेश अग्रवाल, यल्लाप्पा शेट्टी, कुमार आईगुळे, शिवकुमार केंगारे, आकाश शिंदे, संतोष सुरवसे, राहुल पांडे, सोनाली शिंदे, ताई गायकवाड, रवी गायकवाड, राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.
आनंदनगर येथून आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिकेची पहिली निवडणूक लढवली होती. त्यामुळे आनंदनगर आणि अण्णा बनसोडे हे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. इथल्या नागरिकांना आमदार अण्णा बनसोडे यांचेच नेतृत्व आमदार म्हणून निवडून द्यायचे आहे, असे नागरिकांनी सांगितले. आनंदनगर प्रमाणेच शहराच्या विविध भागातून आमदार अण्णा बनसोडे यांना मताधिक्य मिळवून देण्याचे ठरले असल्याचे नागरिक सांगतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.