संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिपाई कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसारच्या ग्रेड पे लक्षात न घेता सातव्या वेतन आयोगात ग्रेड पे लागू करण्यात आला होता. त्यामुळे वेतनात तफावत निर्माण झाल्याने शिपाई कर्मचार्यांत असंतोष निर्माण झाला होता. त्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करून वेतन निश्चित केल्याने कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महापालिकेत शिपाई कर्मचार्यांना एकाएकी पद असल्याने सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या पद नसल्यामुळे वेतन कमी झाले होते. शिपायांना सहाव्या वेतन आयोगामधील ग्रेड पे १९०० रुपये, शिपाई पदाला व नाईक पदाला २००० रुपये व पुढील पदासाठी २४०० रुपये ग्रेड पे होता. सातव्या आयोगामध्ये शिपाई पदाला १३०० ते १७०० रुपये असल्याने शिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. सातव्या वेतन आयोगामध्ये सहाव्या वेतन आयोगाचा ग्रेड पे गृहित धरून वेतन निश्चिती करण्यात आली नव्हती. सातव्या वेतन आयोगामध्ये कमी ग्रेड पे केल्यामुळे वेतनामध्ये तफावत निर्माण झाली होती.
महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीमध्ये १२ मार्च २०२४ ला शिपाई, नाईक, हवालदार व जमादार यांची वेतन निश्चिती करून शासनामार्फत आदेश काढण्यात आला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडून त्याबाबत ११ डिसेंबर २०२४ ला आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शिपायांना पदोन्नती मिळणार असून, वेतनात मोठी वाढ होणार आहे, त्यामुळे शिपाई कर्मचार्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, अशी माहिती कर्मचारी अजय भोसले यांनी दिली. या संदर्भात महापालिकेचे कर्मचारी नागेशराव जाधव, भिमा निकाळजे, अविनाश वाघेरे, रवी वाघेरे, संजय मेढेकर, मोहन फुगे, दिनगर खर्चे, सखाराम घुले, प्रशांत पाडाळे, अजय भोसले, नरेश शेडगे यांनी राज्य शासन व महापालिका स्तरावर पाठपुरावा केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.