Pimpri Chinchwad News: आयोगाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष महागात?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे काम पाहणाऱ्या आणि तीन वर्ष कालावधी झालेल्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे बंधनकारक आहे. मात्र, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न केल्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

शासनाच्या उपमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून तक्रारीच्या पडताळणीचे आदेश, नगर विकास आणि सामान्य प्रशासनाचे सचिव करणार कार्यवाही

विकास शिंदे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे काम पाहणाऱ्या आणि तीन वर्ष कालावधी झालेल्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे बंधनकारक आहे. मात्र, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न केल्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आपच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन नगरविकासचे प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना तक्रारीची पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.  

आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबाबत केलेल्या तक्रारीची भारत निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली आहे. त्या तक्रार अर्जानुसार महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी यांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्र पाठवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न करता निवडणुकीचे काम पाहणाऱ्या  सहायक आयुक्त आणि प्रशासन अधिकारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना तीन वर्ष कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांची बदली न केल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी सदरील तक्रारी अर्जाची तत्काळ तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे उप मुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी यांनी दिले आहेत.  

 'आप' ची काय होती तक्रार ?

भारत निवडणूक आयोगाने २१ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्रान्वये निवडणूक कामकाज पाहणाऱ्या ज्या अधिकाऱ्यांना ३ वर्ष पूर्ण झालेत त्यांना मूळ जिल्हा म्हणजेच महसूल जिल्हा समजण्यात यावा, त्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात, असे निर्देश दिलेले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ नयेत म्हणून निवडणूक कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा तात्पुरता पदभार निरस्त करत अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. तसेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन न करता निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तात्पुरता पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत्या. त्यामुळे संबंधित आयुक्त शेखर सिंह यांची देखील योग्य ती चौकशी करत त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्य मुख्य आयुक्त, विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी तक्रार केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest