शेकडो लाडक्या बहिणी अनुदानापासून वंचित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाखो महिलांनी लाभ घेतला. मात्र, ३० सप्टेंबर अखेर अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिला अद्याप अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. तसेच काही महिलांचे बँकेतील खाते आधार लिंक नाही, बँक खाते बंद झाले आहे, यासह वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी महिलाही शासकीय योजनेपासून वंचित राहिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 23 Oct 2024
  • 12:40 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

३० सप्टेंबरअखेर अर्ज सादर करणाऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाखो महिलांनी लाभ घेतला. मात्र, ३० सप्टेंबर अखेर अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिला अद्याप अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. तसेच काही महिलांचे बँकेतील खाते आधार लिंक नाही, बँक खाते बंद झाले आहे, यासह वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी महिलाही शासकीय योजनेपासून वंचित राहिले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाकडून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये आर्थिक साहाय्य दिले जात आहे. राज्य शासनाने ही योजना राज्यात लागू केली. त्यामध्ये वेळोवेळी नियम व अटी शिथील करण्यात आल्या. त्यामुळे या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवडमधून सव्वा दोन लाख अर्ज लाडक्या बहिण योजनेला सादर झाले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच महिलांच्या खात्यात अनुदान १५०० रुपये जमा झाले. अर्ज उशिरा केलेल्या महिलांच्या खात्यात एकावेळी दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्याने महिलांनी आवश्‍यक वस्तूंच्या खरेदीवर भर दिला. परंतु, ३० सप्टेंबरअखेर शेवटच्या टप्प्यात अर्ज सादर करणा-या शेकडो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे उशिरा अर्ज सादर केल्याने पैसे जमा झाले नाहीत का?, किंवा बॅकेतील तात्रिक कारणांचा महिलांना फटका बसला आहे.

लाभार्थी होऊनही मिळाला नाही लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे गरजेचे होते. त्यामुळे, महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरण्यासाठी टपाल विभागासह विविध सरकारी बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, त्यातील अनेक महिलांची लग्नाच्या अगोदर असलेल्या नावांनी खाती होती. त्यामध्ये आधार क्रमांक लिंक नसल्याने अशा महिलांना टपाल खात्या व्यतिरिक्त दिलेले बँक खाते निरर्थक ठरले आहे. अशा महिला योजनेत लाभार्थी होऊनही त्यांना लाभ मिळाला नाही. त्यांनी आधार लिंक तपासणी केली असता त्यांचे आधार कार्ड वेगळ्याच बँकेला लिंक असल्याचे समोर आले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिली होती. शेवटच्या मुदतीपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातून ३ हजार ३०० महिलांनी अर्ज केला आहे. 

मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे अचानक पोर्टल बंद केल्यामुळे अनेक बहिणींचे ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाली.

लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला अर्ज यशस्वीपणे जमा केला. तसा संदेश मला आला. मात्र, आजपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही. या योजनेचा अर्ज भरताना मी लग्नानंतरच्या नावाचा बँक खाते क्रमांक दिला होता. त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

- अश्विनी शिंदे, चिंचवड

Share this story

Latest