ताथवडे - पुनावळे अंडरपास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; ड्रेनेज पाणी साचून जागोजागी खड्डे, दुर्गंधीने नागरिक हैराण

ताथवडे - पुनावळे अंडरपास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सायंकाळी सहानंतर वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या असतात. त्यातच अंडरपासमध्ये ड्रेनेज पाणी साचून जागोजागी खड्डे देखील पडले आहेत.

ताथवडे - पुनावळे अंडरपास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; ड्रेनेज पाणी साचून जागोजागी खड्डे, दुर्गंधीने नागरिक हैराण

अंडरपासमध्ये ड्रेनेजच्या पाण्याला दुर्गंधी, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

ताथवडे - पुनावळे अंडरपास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सायंकाळी सहानंतर वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या असतात. त्यातच अंडरपासमध्ये ड्रेनेज पाणी साचून जागोजागी खड्डे देखील पडले आहेत. त्या ड्रेनेज पाण्यामुळे दुर्गंधी सुटली असून वाहनचालकासह परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  

वाकड, ताथवडे, पुनावळे अंडरपासच्या चहूबाजूला शेकडो सदनिकांचे गृहप्रकल्प तयार झाले आहेत. त्या भागात नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीला जाणा-या नागरिकांची ताथवडे - पुनावळे अंडरपासमधून ये - जा असते. पण, तेथील रहिवाशांना वाहतूक कोंडी, अंडरपासमधील ड्रेनेज पाणी, खड्डे यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच महामार्गावर मायनिंगचे सुरू असलेले काम यामुळे सेवा रस्ता आणि अंडरपासमध्ये वाहनांच्या रांगा लागत असून रात्री आठच्या सुमारास वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. वाकड वाहतूक पोलीसदेखील सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, कधी-कधी ही कोंडी आवरणे त्यांनाही अवघड जाते. सकाळी नऊ ते अकरा, दुपारी एक ते दोन व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत म्हणजेच शाळा, कॉलेजेस, आयटी पार्क व लहान-मोठ्या कंपन्या सुटण्याच्या वेळेस सर्वांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने सेवा रस्त्यावर ताण येत आहे.

ताथवडे आणि पुनावळे अंडरपासच्या आजूबाजूला झालेल्या असंख्य मोठ्या गृहप्रकल्पात रहिवासी वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे त्यांचाही या वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. परिसराचा कायापालट झालेला असताना गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे अवस्थेत असलेले येथील मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भुयारी मार्ग वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. महामार्ग प्रशासनाने भुयारी मार्गाची उंची वाढवून या समस्येतून सर्वांची सुटका करावी अशी मागणी होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest