संग्रहित छायाचित्र
करमणूक केंद्राच्या नावाखाली तीन पत्त्यांचा जुगार चालवणार्या अड्ड्यावर चिंचवड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ३१ जणांवर गुन्हा दाखल करून १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चिंचवड-बिजलीनगरमधील ओम कॉलनी येथील आधार बहुउद्देशीय संस्थेमध्ये करण्यात आली.
चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी याबाबत माहिती दिली. बिजलीनगर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेला धर्मादाय आयुक्तालयाकडून करमणूक केंद्राचा परवाना देण्यात आला आहे. असे असताना त्या ठिकाणी काही लोक एकत्र जमून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती गस्त घालणार्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी करमणूक केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत दावनमलिक जलाल नदाफ, भावेष कैलास शहा, भगवान बाळाराम भोई, नितीन दिलीप सूर्यवंशी, जब्बार करीम शेख, नागेश भागवत देवकळे, दीपक हिरानंद लालवानी, अमोल महादेव बिराजदार, बाळासाहेब बबन जानराव, बापू रामदास करमवार, वासुमल कळमन तुलसानी, मुरली ईश्वरदास यलवानी, सतीश ज्ञानेश्वर बोडके, संतोष दुदु राठोड, हमिद जलाल नदाफ, मनीष सुरेश मावळतकर, रोहित बाळासाहेब घारे, बापू गोरक्षनाथ गराडे, सुनील बचन कडू, सचिन धोंडू पलांडे, किरण प्रकाश चौधरी, अमित तानाजी शेलार हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशावर तीन पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले.
या आधार बहुउद्देशीय संस्थेचा परवानाधारक अभिमान मोहन मिसाळ व त्याचे कामगार नितीन आप्पा राठोड, श्रीनिवास विरभद्र चलवादी, प्रीतम उदयसिंग कुमार, अविनाश दशरथ शिंदे, जब्बार करीम शेख, राम खंडू सगट, प्रवीण वैजीनाथ गोरे, नवाज दस्तगीर तांबोळी, जब्बार करीम शेख यांनी करमणूक परवान्याचा भंग करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, घटनास्थळावरून जुगाराची साधने, वस्तू, मोबाईल, वाहने असा १८ लाख ६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.