पिंपरी-चिंचवड: वाकडच्या कस्तुरी चौकात पर्यावरण शिल्पाचे अनावरण

वाकड येथील कस्तुरी चौकामध्ये उभारण्यात आलेल्या प्राजच्या पर्यावरण शिल्पाचे अनावरण आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते तसेच प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Pimpri Chinchwad, Wakad, Kasturi Chowk, Environment Sculpture, Shekhar Singh, PCMC

वाकडच्या कस्तुरी चौकात पर्यावरण शिल्पाचे अनावरण

पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते उद्घाटन

वाकड येथील कस्तुरी चौकामध्ये उभारण्यात आलेल्या प्राजच्या पर्यावरण शिल्पाचे अनावरण आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते तसेच प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या अनावरणप्रसंगी मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, स-शहर अभियंता प्रमोद ओंभासे, क्षेत्रीय अधिकारी अंकुश जाधव, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर आणि प्राज इंडस्ट्रीजचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल रोखण्याच्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हिंजवडी येथील कस्तुरी चौकामध्ये पर्यावरण शिल्प उभारण्यात आले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम आणि त्यामुळे पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका याविषयी जागरूकता निर्माण करणे हे या पर्यावरण शिल्पाचे उद्दिष्ट आहे. कस्तुरी चौकामधील हे पर्यावरण शिल्प हैदराबाद येथील स्नेहा आर्ट स्टुडिओच्या सहभागातून प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने उभारण्यात आले आहे. हे शिल्प तयार करण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला असून सुमारे २१ फूट उंच आणि १५ फूट रुंद अशा भव्य-दिव्य शिल्पामध्ये नक्षीदार कोरीव कामही करण्यात आले आहे.

या शिल्पाच्या तळाशी एक टोपी कोरण्यात आली आहे जी सुरक्षिततेचे महत्त्व  दर्शवते. शिल्पाच्या केंद्रस्थानी डीएनए हेलिक्स दाखवण्यात आले आहे, जे समाज आणि शाश्वतता यांच्यातील वीण अधिकाधिक घट्ट करत नेण्याच्या अविरत प्रयत्नांचे द्योतक आहे. तसेच शिल्पामध्ये कोरलेले इतर घटक उद्योजकता, नावीन्यता आणि ऊर्जा-सुरक्षितता दर्शवितात. पर्यावरण शिल्पाच्या खालच्या बाजूच्या सभोवताली असणारी ३ इंधन वितरण केंद्रे ही जैवभारापासून बनलेल्या  पर्यावरणस्नेही जैव-इंधनाची द्योतक आहेत. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest