पिंपरी-चिंचवड : ड्रीम्स ११ (Dreams 11)मधून करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे (PSI Somnath Zende Suspended) यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत झेंडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे रातोरात करोडपती झालेल्या झेंडे यांना ड्रीम्स ११ खेळणे चांगलेच महागात पडले आहे. (online betting app) पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत झेंडे यांचे निलंबन करण्यात आहे. (Pimpri Chinchwad Police)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये कार्यरत असलेले पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी क्रिकेट विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी ड्रीम्स ११वर टीम तयार केली होती. त्यामध्ये अवघ्या आठ तासांत ते करोडपती झाले होते. दीड कोटी रुपये जिंकले असून टॅक्स जाऊन त्यांना एक कोटी पाच लाख रुपये मिळाले होते.
ड्रीम ११ ची जाहिरात करणाऱ्या बॉलीवूडमधील अभिनेत्यांवर आणि विविध क्षेत्रातील खेळाडूंवर आक्षेप घेतला जात असताना एका पोलिसानेच पैसे जिंकल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. झेंडे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम त्यांनी तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झेंडे यांच्यावर निलंबणाची कारवाई केली होती. त्यामुळे एका रात्रीत क्रिकेटच्या ड्रीम ११ मधील तब्बल दीड कोटी रुपयांचे मानकरी ठरलेले झेंडे यांच्या नोकरीवर गदा आली आहे.
झेंडे यांची पिंपरी चिंचवड पोलिसांनीच चौकशी केली असून यामध्ये त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला, आता पुढे विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःचं म्हणणं मांडता येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.