पिंपरी-चिंचवड : डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे पिंपरी गावात जल्लोषात स्वागत
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे पिंपरी गाव परिसरात अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मा विकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी गाव परिसरात आपली प्रचार फेरी आयोजित केली होती यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना नेते राजाराम कुदळे, स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वाघेरे, काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते उमेश खंदारे, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश वाघेरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचार फेरीचा प्रारंभ महात्मा फुले महाविद्यालयापासून सुरू झाला.
पिंपरी गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पिंपरीतील मतदारांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे पुष्पवृष्टीच्या वर्षावात स्वागत केले. त्यानंतर माळी अळी येथील संत सावतामाळी मंदिरात मतदारांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी यावेळी वाघेरे कॉलनी, पिंपरी वाघेरे गाव, माळी आळी, कापसे आळी, वैभव नगर, पवना समाचार लेन, बालगोपाल विद्यानिकेतन, सुषमा सोसायटी, डांगे चाळ, अशोक चित्र चित्रमंदिर परिसर आदी भागातून आपली प्रचार करी काढली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.