पिंपरी-चिंचवड : देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या विश्वासाने आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास ; खासदार सुप्रिया सुळे

गेली दहा वर्ष गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता होती. तरीही, चिंचवड मतदारसंघात नागरी समस्या कायम आहेत. मूलभूत गरजांची पूर्तता आणीआवश्यक सोयी सुविधांसाठी आजही येथील नागरिक संघर्ष करत आहेत. प्रचंड ट्रॅफिक, वायू प्रदूषण, अपुरे पाणी, विजेचा लपंडाव असे अनेक प्रलंबित प्रश्न कायम आहेत.

Rahul Kalate

पिंपरी-चिंचवड : देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या विश्वासाने आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास ; खासदार सुप्रिया सुळे

राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ संवाद बैठकी : सत्ता येताच आयटीयन्सच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार

वाकड : गेली दहा वर्ष गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता होती. तरीही, चिंचवड मतदारसंघात नागरी समस्या कायम आहेत. मूलभूत गरजांची पूर्तता आणीआवश्यक सोयी सुविधांसाठी आजही येथील नागरिक संघर्ष करत आहेत. प्रचंड ट्रॅफिक, वायू प्रदूषण, अपुरे पाणी, विजेचा लपंडाव असे अनेक प्रलंबित प्रश्न कायम आहेत. आता, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पुन्हा तेच-तेच आश्वासने देऊन त्यांचेच उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरत आहेत. मात्र, गेली दहा वर्ष चिंचवडमतदार संघात नक्की तुम्ही केलं काय? असा प्रश्न पडतो. राज्यात महाविकास आघाडीची सात येताच करदात्यांना मूलभूत सुविधा देण्याला प्राधान्य असेल असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी वाकड येथे दिले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांशी छोटेखाणी बैठकीत संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, महिला प्रदेश प्रदेशाध्यक्षा स्वाती चिटणीस, महिला प्रदेश संघटक मंजिरी धाडगे, आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे, युवकाध्यक्ष इम्रान शेख, नवनाथ जगताप, कार्याध्यक्ष सागर तापकीर,ज्योती निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

सुळे पुढे म्हणाल्या, एक हाती सत्ता असताना नागरिकांना केवळ आश्वासनं दिली, समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले नाही त्यामुळे मतदार संघात वीज, पाणी, सुरक्षित रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा यासारख्या समस्या कायम आहेत. यापलीकडे जाऊन प्रशस्त उद्याने, मनोरंजन केंद्र, पर्यावरण यासाठी सुद्धा ठोस कामे झाली नसल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, मागच्या तीन निवडणुकात दिलेली किती आश्वासने पूर्ण केली हा संशोधनाचा विषय आहे. प्रामुख्याने, ब्लु लाईनमधील घरांचा प्रश्न का सुटला नाही? सोसायट्यांमध्ये टँकर राज का? सुरु झाले आहे. पुनावळे, रावेत, वाकडमधले महामार्गा लगत असलेल्या सर्व्हिस रोडचे रुंदीकरण का? रखडले आहे. ठीक ठिकाणी सेवा रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था का? झाली आहे. कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. याची परिनीती म्हणून मतदार संघात सगळीकडे सत्ताधाऱ्यां विरोधात प्रचंड नाराजी आणी अविश्वास दिसत आहे. त्यामुळे, यंदा चिंचवड मतदार संघात बदल हा निश्चित आहे अशा चर्चा गावठाण, वाड्या वस्त्या ते उच्चभ्रू सोसायटी धारकांमध्ये ऐकायला मिळत आहे.

आयटीयन्सने मांडले समस्यांचे गाऱ्हाणे 

यावेळी चिंचवड विधानसभेतील नागरिकांनी सुळेंशी संवाद साधण्यासाठी गर्दी केली होती. हिंजवडीतील ९ तासांच्या नोकरीसाठी तब्बल पाच तासांहुन अधिक वेळ ट्रॅफिकमध्ये जातो, वर्दळ असलेल्या वाकड, पिंपळे सौदागरला मेट्रो कनेक्टिव्हीटी का नाही? हिंजडीतील मेट्रो बालेवाडीकडे न वळता त्याची हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा असा रूट का नाही?  आटीयन्स नाईलाजाने कारने प्रवास करतात मात्र ट्राफिकमुळे इंधनाच्या अपव्ययाबरोबर वेळ पैसा यामुळे नैसर्गिक संसाधनांचा गुन्हेगारी अपव्यय व प्रदूषणात भर पडते. २४x ७ पाणी पुरवठा कुठे आहे. मालमत्ता हस्तांतरणाचे टॅक्सेस कमी करावे,  आयटीतील खड्ड्यांची मालिका, विज लपंडावाची डोकेदुखी, जनरेटरवर डिझेरलसाठी वर्षाकाठी लाखो रूपयांचा खर्च, टँकरद्वारे तहान भागविण्यासाठी वर्षाकाठी २० लाख ते १ कोटींचा खर्च आदी समस्यांचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले.

या बैठकी नंतर त्यांनी पत्रकांशी संवाद साधताना सुळे म्हणालया राईट टू डिस्कनेकट हा कायदा मीच आणला. मूलभूत आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य न दत्त बीग टीकीट कामांना भाजप प्राधान्य देत. हजारो कोटींची उधळपट्टी केली जाते. जलजीवन मिशन- हरघर जल योजनेचे काय झाले? हजारो  कोटींचा केवळ चुराडा झाला. याबाबतच्या ऑडिटची आणि श्वेत पत्रिकेची मी मागणी करणार आहे.  महाविकास आघाडी सत्तेत येताच पाणी, रस्ते, मूलभूत सुविधाबाबात रोड मॅप करणार 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest