पिंपरी-चिंचवड : रावेत रस्त्यांवर अंधेरा कायम है!

स्त्रीचा रावेत बाह्यवळण मार्गावरील उड्डाणपूल व मार्गातील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या अंधारातून प्रवास करताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

पिंपरी-चिंचवड : रावेत रस्त्यांवर अंधेरा कायम है!

सीसीटीव्हीची मागणी, अपुऱ्या प्रकाशामुळे नागरिकांना होतोय

स्त्रीचा रावेत बाह्यवळण मार्गावरील उड्डाणपूल व मार्गातील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या अंधारातून प्रवास करताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच समोरून येणाऱ्या वाहनाच्या दिव्यांचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडत असल्याने वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे.

प्राधिकरण, रावेत परिसरातील नागरिक या रस्त्याने प्रवास करत असतात. येथून रात्रीच्या वेळी शतपावलीला जाणाऱ्यांची संख्याही बरीच असते. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना आणि रस्ता ओलांडताना जिकिरीचे वाटते. वाहनचालकांनाही अंधारामुळे वाहनासमोरून येणाऱ्या जाणाऱ्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक कोणी समोर आल्यास त्यांचीही तारांबळ उडते. येथून प्रवास करणाऱ्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. 

उड्डाणपुलासह मार्गात काही ठिकाणी विद्युत वाहिन्या चोरी झाल्याने पथदिवे बंद असल्याचे सांगण्यात येत आहेत. तर, लवकरच विद्युत वाहिनी टाकून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वीही याच मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नलच्या केबल कापलेल्या आढळून आल्या होत्या. या भागातून महिला, विद्यार्थिनी प्रवास करत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने उडाणपुलासह या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच नियमित पोलिस पेट्रोलिंग करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

रावेत परिसरात लोकवस्ती वाढत आहेत. या ठिकाणी नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे असुरक्षित वाटते. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीच्या प्रमाणात विजेची व्यवस्था करण्यात यावी. 

- विजय माळी, स्थानिक नागरिक, रावेत

Share this story