एकत्रित योगदानातून संस्कृती समृद्ध होते : डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

मानवी संस्कृती ही समाजाच्या एकत्रित योगदानातून समृद्ध होते, असे विचार प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पिंपरी येथे सोमवारी, (दि. ९) रोजी व्यक्त केले. 'विचारवंतांचे अंतर्मन' या समीक्षापर पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 12 Dec 2024
  • 01:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मानवी संस्कृती ही समाजाच्या एकत्रित योगदानातून समृद्ध होते, असे विचार प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पिंपरी येथे सोमवारी, (दि. ९) रोजी व्यक्त केले. 'विचारवंतांचे अंतर्मन' या समीक्षापर पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, मूळ पिंड लेखकाचा असलातरी पुरुषोत्तम सदाफुले यांनी साहित्य अन् संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. या वाटचालीत विविध समाजसुधारक, नेते, विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि प्रतिभावंतांचे सान्निध्य त्यांना लाभले. या सार्वकालीन अन् समकालीन व्यक्तिमत्त्वांच्या वेगवेगळ्या विचारसरणीबाबत भेदाभेद न करता कवि हृदयाच्या सदाफुले यांनी त्यांचे अंतर्मन जाणून घेत त्यांची विचार मौक्तिके या पुस्तकात संकलित केली आहे. हे केवळ वैचारिक संकलन नसून संस्कृतीच्या विकास अन् संवर्धनासाठी त्यावर मनन अन् चिंतन करीत त्यांनी समीक्षापर भाष्य केले आहे.

सौरभ पाटील, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद - भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, इंद्रायणी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, लेखिका ललिता सबनीस, प्रकाशक नितीन हिरवे आणि लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांची प्रमुख उपस्थिती होती. दिगंबर ढोकले यांनी, 'विचारवंतांचे अंतर्मन' वाचल्यावर सर्वसामान्य माणूसदेखील ज्ञानी होईल असे या ग्रंथाचे स्वरूप असल्याचे मत व्यक्त केले. सौरभ पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest