चाकण-आंबेठाण मार्गावर कंटेनरची दुकानांना धडक

चाकण-आंबेठाण मार्गावर कंटेनरने धडक दिल्याने दुकाने भुईसपाट झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. चाकण-आंबेठाण रस्त्यावर मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते.

चाकण-आंबेठाण मार्गावर कंटेनरची दुकानांना धडक

चाकण-आंबेठाण मार्गावर (Chakan Ambethan Road) कंटेनरने धडक दिल्याने दुकाने भुईसपाट झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. चाकण-आंबेठाण रस्त्यावर मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते.  (Chakan Road Accident)

एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये जाणारा एकमेव मार्ग असल्याने मार्गावर रात्रं-दिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. गुरुवारी सकाळी सहा वाजता वासुली बाजूकडून येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रानवारा हॉटेलसमोरील दोन छोट्या दुकानांना जोराची धडक बसल्याने दुकाने अक्षरशः भुईसपाट झाली. कंटेनरची पुढील दोन्ही चाके निखळून पडली आहेत. याच कंटेनरचालकाने मुळेवस्ती येथे एका चारचाकीस कट मारल्याने तो थोडक्यात बचावला. चाकण-वासुली फाटादरम्यान अपघातांची मालिका वाढत आहे. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest