संग्रहित छायाचित्र
मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर 'मतदान अवश्य करा' असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महापालिका विविध उपक्रम राबवीत असून मतदार जनजागृतीसाठी महापालिकेने शहरात प्रवास करणाऱ्या सुमारे १ हजार ऑटो रिक्षांवर मतदानाचे संदेश फलक लावले आहेत. या मतदार जनजागृतीपर संदेशफलकांची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
रविवारी निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या रिक्षाद्वारे करण्यात येणा-या मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त अण्णा बोदडे, साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, कार्यकारी अभियंता राजीव घुले, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, मनोज माचरे, प्रिन्स सिंह , महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.