संग्रहित छायाचित्र
पुणे-नाशिक महामार्गावरील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती ते टोल नाका दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या आठ ते दहा चेंबरची झाकणे गायब झाली आहेत. काही झाकणे तुटल्याने अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बिगर झाकणाच्या चेंबर मुळे पादचारी नागरिक व वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने त्वरित या झाकणांची दुरुस्ती करून घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचत असते. पाण्यामुळे नागरिकांना या ठिकाणी असलेले चेंबर दिसत नाहीत. त्यामध्ये चेंबरला झाकण नसल्याने एखादी व्यक्ती अथवा वाहन अडकून अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने चेंबरची सर्व झाकणे त्वरीत बदलून, रस्ता सुस्थितीत करावा. अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
मासुळकर कॉलनीमध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील मासुळकर कॉलनीमध्ये गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांनी केली आहे. महापालिकेच्या सारथी ॲपवर त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. लवकर गतिरोधक करून नागरिकांचा जीव वाचवावा, अशी मागणी जाधव यांनी केली.
महापालिकेच्या सारथीवर केलेल्या तक्रारीमध्ये जाधव यांनी नमूद केले आहे की, अजमेरा, मासुळकर कॉलनी या मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण नव्याने करण्यात आले आहे. डांबरीकरणानंतर रस्त्यावर जे गतिरोधक होते ते पुन्हा नव्याने करण्यात आले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.