'बीआरटी'मधील घुसखोरी पडणार चांगलीच महागात

शहरातील बीआरटी मार्गात खासगी वाहने घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरातील चार बीआरटी मार्गांत घुसखोरी करणाऱ्या तब्बल ४४ हजार ९८६ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 5 Sep 2023
  • 10:16 am
BRT

'बीआरटी'मधील घुसखोरी पडणार चांगलीच महागात

शहरातील बीआरटी मार्गात खासगी वाहने घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरातील चार बीआरटी मार्गांत घुसखोरी करणाऱ्या तब्बल ४४ हजार ९८६ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून ३ कोटी १० लाख ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातत्याने नियमभंग करणाऱ्या २५०० चालकांचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांनी परिवहन विभागाला पाठवला आहे.

नागरिकांना जलद वाहतूक सेवा देता यावी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सात बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू केले आहेत. यातील पिंपरी-चिंचवड हद्दीत चार आणि पुणे हद्दीत तीन बीआरटी मार्ग आहेत. यातून दिवसाला ७५० ते ८०० बस धावतात. त्या माध्यमातून दिवसाला ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. पण, बीआरटी मार्गात बऱ्याच वेळा खासगी वाहनांची घुसखोरी होते. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा निर्माण होतो. बऱ्याचदा अपघात होतात. तर आतापर्यंत अशा अपघातांमध्ये अनेकाचा जीव गेला आहे.

बीआरटी मार्गातील घुसखोरी रोखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून (परिवहन विभाग) दंडात्मक कारवाई केली जाते. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान अशा ४४ हजार ९८६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या चालकांकडून ३ कोटी १० लाख ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

दंड आकारूनही सुधारणा नाही

बीआरटीत  घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिस दंड वसूल करतात. पहिल्या वेळेस ५०० रुपये त्यानंतर जेव्हा बीआरटीमध्ये वाहन जाईल तेव्हा १५०० रुपये दंड वसूल केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकरूनही काही वाहनचालक नियमाचे उल्लंघन करतात. तीन ते चार वेळा दंड भरणाऱ्या चालकांची संख्याही जास्त आहे.

सलग तीन वेळा नियम भंग करणाऱ्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात यावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव आमच्याकडून पिंपरी-चिंचवड परिवहन विभागाला पाठविण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी, बीआरटी मार्गात अनेक लोक खाजगी वाहन घालतात. या मुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन, अशा बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

- विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक 

 

महिना             कारवाई          दंड (रुपयांत)

जानेवारी           ४५३२                  २९,४५,५००

फेब्रुवारी           ७४२६                  ४६,१८,५००

मार्च                 ६७३९                 ४४,२०,५००

एप्रिल               ५८७८                 ४०,३४,५००

मे ५१८२ ३६,६६,०००

जून ४९८६ ३६,२३,५००

जुलै ४६६६ ३५,०१,०००

ऑगस्ट ५५७७ ४२,३१,५००

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest