घरात छापा टाकून २ लाखा गांजा जप्त, दोन जणांना अटक
भोसरी परिसरातील एका घरात छापा मारून पोलीसांनी तब्बल १ लाख ८६ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तसेच दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडमधील अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. १९) केली आहे.
संगिता निवृत्ती जेधे (वय ४० रा. लांडगेनग, भोसरी पुणे) आणि अमर निवृत्ती जेधे (वय २८, रा. लांडगेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली विरोधी पथकातील कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्यात हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी लांडगेनगर येथील एका खोलीत गांजाचा व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा टाकून संगिता जेधे आणि अमर जेधे यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून ५० हजार ०२५ रुपये किमतीचा एकुण २ किलो ००१ ग्रॅम वजनाचा गांजा, ३६ हजार रुपये रोख रक्कम आणि १ लाख रुपये किमतीचा अॅपल मोबाईल फोन असा एकूण १ लाख ८६ हजार ०२५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तसेच आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.