संग्रहित छायाचित्र
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.७) मतदान होणार आहे. बारामती मतदार संघातील काही भाग हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून, येथील २० मतदान केंद्रात एकूण ९३ बूथ आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा एक हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.
बारामती मतदार संघातील २० मतदान केंद्र आणि त्यातील ९३ बूथ वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. यामध्ये एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, ९० अधिकारी (निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक) ७२२ कर्मचारी, ८१ होमगार्ड, पाच विशेष सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी असा तब्बल हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.