पालिकेकडून १३ थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव

महापालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार असलेल्या नागरिकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांचा लिलाव काढण्यात येणार आहे. करसंकलन विभागाकडून शहराच्या विविध भागातील १३ मिळकती लिलावात काढल्या असून त्यात ७ निवासी आणि ६ बिगरनिवासी मिळकतींचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र

मिळकतकर वसुलीसाठी प्रशासन आक्रमक, लिलावात ७ निवासी तर ६ बिगर निवासी मिळकतींचा समावेश

विकास शिंदे
महापालिकेच्या (PCMC) हद्दीतील थकबाकीदार असलेल्या नागरिकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांचा लिलाव काढण्यात येणार आहे. करसंकलन विभागाकडून शहराच्या विविध भागातील १३ मिळकती लिलावात काढल्या असून त्यात ७ निवासी आणि ६ बिगरनिवासी मिळकतींचा समावेश आहे. या प्रत्येक मिळकतीचे मूल्यांकन करून अपेक्षित रक्कम मिळकतीसमोर नमूद करण्यात आली असून, या लिलाव बोलीत सहभागी होणार्‍या इच्छुकांना मिळकतीच्या मूल्यांकनाच्या एक टक्के बयाणा रकमेचा डीडी महापालिका मुख्यालयातील करसंकलन विभागात २७ मार्चपर्यंत जमा करायचा आहे. (Pimpri Chinchwad News)

वर्षानुवर्षे मिळकतकर थकबाकी ठेवणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या अंतर्गत विविध योजना, धोरणे, निर्णय घेऊन अधिकाधिक थकबाकी वसुलीचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वसूचना देणे, जप्ती करणे, प्रसंगी जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, असे नियोजन केले आहे. मिळकतकर वसुलीसाठी एसएमएस व कॉलिंगद्वारे आवाहन केले जात आहे. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई केली जात आहे. महापालिकेने जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.  

वर्षानुवर्षे थकीत कर वसुलीसाठी महापालिका कर संकलन व करआकारणी विभाग प्रयत्न करीत आहे. या वर्षी एक हजार कोटी रुपये मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सिद्धी प्रकल्पाअंतर्गत शंभर टक्के मिळकतकर बिलांचे वाटप घरोघरी केले आहे. त्या अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांना, २२ हजार मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीस दिल्या आहेत. हे करूनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार मिळकतधारकांची नावे करसंकलन विभागाच्या वतीने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली आहेत.

शहरात पुरवल्या जाणार्‍या विविध नागरी सुविधांकरिता केला जाणारा खर्च महापालिकेच्या तिजोरीत केला जातो. मात्र, मालमत्ता कर भरणा कमी असल्यास त्याचा थेट परिणाम  विकास कामांवर पडत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेवर जमा करून आपले कर्तव्य पार पाडावे.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, पिंपरी चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest